चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीसाठी मतदान केंद्राची संख्या वाढवावी - मेघराज राजेभोसले
schedule27 May 26 person by visibility 40 categoryलाइफस्टाइल
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी,कोल्हापूर : अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीसाठी सात जून २०२६ रोजी मतदान होत आहे. या निवडणुकीसाठी मतदान केंद्राची संख्या वाढवावी. विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, कोकण, ठाणे-पालघर या भागातील मतदारांनाही मतदान करणे सुलभ व्हावे यासाठी मतदान केंद्रात वाढ करावी अशी मागणी महामंडळाचे प्रभारी अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी निवडणूक अधिकारी रागिणी खडके यांच्याकडे केली आहे. छत्रपती संभाजीनगर, नाशिक, नागपूर, सावंतवाडी, ठाणे येथे अतिरिक्त मतदान केंद्रांची सुविधा करावी असे त्यांची मागणी आहे.