Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
बाजार समितीच्या पदाधिकारी निवडीत रंगल्या राजकीय कोट्या, मनातील सल अन् सभापतिपदासाठी वाट पाहण्याची ईच्छा‘कोल्हापूरचे महापौर’पुस्तकाच्या तिसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन दिमाखातप्रल्हाद चव्हाणांनी स्वहिताची नव्हे तर समाजहिताची भूमिका अंगिकारुन आयुष्यभर कार्य केले- पालकमंत्री प्रकाश आबिटकरपुणे शिक्षक मतदारसंघासाठी टीडीएफकडून  कौस्तुभ गावडे यांची  उमेदवारी जाहीरकोल्हापूर बाजार समितीच्या सभापतिपदी प्रा. शेखर देसाई, उपसभापतिपदी पांडूरंग काशीदकोल्हापूर शहरात 31 ऑगस्ट रोजी कमी दाबाने पाणीपुरवठाशिक्षण समितीने मागवली प्रशासक कालावधीतील शिक्षण विभागाच्या कामकाजाची माहितीडॉ. रोझारिओ डिसोझा यांना आरोग्य विद्यापीठाची पीएचडीपद्मश्री प्रभाकर कोरेंचा शरद पवारांच्या हस्ते तीन सप्टेंबरला पुण्यात सत्कारअन्यायकारक संचमान्यतेच्या धोरणाविरोधात सोमवारी शिक्षण उपसंचालक कार्यालयाला टाळे ठोक आंदोलन

जाहिरात

 

कोल्हापूर बाजार समितीच्या सभापतिपदी प्रा. शेखर देसाई, उपसभापतिपदी पांडूरंग काशीद

schedule28 Aug 26 person by visibility 388 category

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे संचालक प्रा. शेखर शंकरराव देसाई यांची निवड झाली तर उपसभापतीपदी जनसुराज्य शक्ती पक्षाचे पांडुरंग गणपती काशीद यांची निवड झाली. सहाय्यक निबंधक प्रेमदास राठोड यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी 28 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी चार वाजता संचालक मंडळाची बैठक झाली. या बैठकीत सभापती व उपसभापती या निवडीवर शिक्कामोर्तब झाले.
प्रा देसाई हे माजी आमदार के पी पाटील यांच्या गटाचे तर उपसभापती काशीद हे जनसुराज्य शक्ती पक्षाचे नेते विनय कोरे यांचे कार्यकर्ते आहेत. मावळते सभापती नानासो कांबळे यांनी 11 ऑगस्ट रोजी सभापतीपदाचा राजीनामा दिला होता तर उपसभापती राजाराम चव्हाण यांचे निधन ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात झाले होते. त्यामुळे सभापती व उपसभापती निवडीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. त्या अनुषंगाने शुक्रवारी दुपारी संचालक मंडळांची बैठक बोलावण्यात आली होती. बाजार समितीमध्ये सर्वपक्षीय सत्ता आहे. या वेळेला सभापतिपद राष्ट्रवादीकडे तर  उपसभापतिपद जनसुराज्य  पक्षाला मिळाले. मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली नेतेमंडळींची जिल्हा मध्यवर्ती बँकेत बैठक झाली.  त्या बैठकीत सभापती व उपसभापती यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक ए वाय पाटील, गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडे हे बाजार समितीत दाखल झाले. त्यांनी संचालक मंडळाची बैठक घेतली. त्या बैठकीत त्यांनी, संचालकांच्या समोर सभापती व उपसभापती पदासाठी नाव निश्चित केलेल्या संचालकांची नावे जाहीर केली. यानंतर बाजार समितीच्या सभागृहात संचालक मंडळाची बैठक झाली. सहायक निबंध राठोड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सभापती व उपसभापती निवडी करण्यात आल्या दोन्ही पदासाठी प्रत्येकी एकेक अर्ज दाखल झाल्याने या निवडी बिनविरोध झाल्या. सभापतिपदी प्रा. देसाई व उपसभापतीपदी काशीद यांची निवड होताच संचालकांनी त्यांचे अभिनंदन केले. सभापती पदासाठी देसाई यांचे नाव नानासो कांबळे यांनी सुचवले तर त्याला संचालक संदीप व्हरांडेकर यांनी अनुमोदन दिले. उपसभापतीपदासाठी काशीद यांचे नाव संचालक शिवाजी पाटील यांनी सुचवले तर त्याला संचालक बाळासाहेब पाटील यांनी अनुमोदन दिले.
 या बैठकीला संचालक व मावळते अध्यक्ष नानासो कांबळे, संचालक प्रकाश देसाई, भारत पाटील भुयेकर, सुयोग वाडकर,  सोनाली पाटील, मेघा राजेंद्र देसाई, नंदकुमार वळंजू, कुमार अहुजा, पैलवान संभाजी पाटील आदी उपस्थित होते. बाजार समितीचे सचिव तानाजी दळवी यांची उपस्थिती होती. या निवडीच्या बैठकीला संचालक सूर्यकांत पाटील गैरहजर राहिले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes