Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
बाजार समितीच्या पदाधिकारी निवडीत रंगल्या राजकीय कोट्या, मनातील सल अन् सभापतिपदासाठी वाट पाहण्याची ईच्छा‘कोल्हापूरचे महापौर’पुस्तकाच्या तिसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन दिमाखातप्रल्हाद चव्हाणांनी स्वहिताची नव्हे तर समाजहिताची भूमिका अंगिकारुन आयुष्यभर कार्य केले- पालकमंत्री प्रकाश आबिटकरपुणे शिक्षक मतदारसंघासाठी टीडीएफकडून  कौस्तुभ गावडे यांची  उमेदवारी जाहीरकोल्हापूर बाजार समितीच्या सभापतिपदी प्रा. शेखर देसाई, उपसभापतिपदी पांडूरंग काशीदकोल्हापूर शहरात 31 ऑगस्ट रोजी कमी दाबाने पाणीपुरवठाशिक्षण समितीने मागवली प्रशासक कालावधीतील शिक्षण विभागाच्या कामकाजाची माहितीडॉ. रोझारिओ डिसोझा यांना आरोग्य विद्यापीठाची पीएचडीपद्मश्री प्रभाकर कोरेंचा शरद पवारांच्या हस्ते तीन सप्टेंबरला पुण्यात सत्कारअन्यायकारक संचमान्यतेच्या धोरणाविरोधात सोमवारी शिक्षण उपसंचालक कार्यालयाला टाळे ठोक आंदोलन

जाहिरात

 

कोल्हापूर शहरात 31 ऑगस्ट रोजी कमी दाबाने पाणीपुरवठा

schedule28 Aug 26 person by visibility 50 categoryमहानगरपालिका

 सी व डी वॉर्डचा बालिंगा व नागदेववाडीवरून नेहमीप्रमाणे  पाणीपुरवठा कायम

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीमार्फत सोमवारी 31 ऑगस्ट 2026 रोजी काळम्मावाडी 33 केव्ही सबस्टेशन येथे आयसोलेटर बसविण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. या कामामुळे येथील विद्युत पुरवठा बंद राहणार असल्याने काळम्मावाडी योजनेमधून शहराला पाणीपुरवठा होऊ शकणार नाही. तथापि, पर्यायी व्यवस्था म्हणून शहरास शिंगणापूर, बालिंगा व नागदेववाडी पंपिंग स्टेशनमधून पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. त्यामुळे सोमवार, दिनांक  31 ऑगस्ट व मंगळवार 1 सप्टेंबर 2026 रोजी शहरातील दैनंदिन पाणीपुरवठा कमी दाबाने होणार असून बुधवारी 2 सप्टेंबर 2026 पासून पाणीपुरवठा सुरळीत होणार येईल. तसेच सी व डी वॉर्डचा पाणीपुरवठा बालिंगा व नागदेववाडीवरून नेहमीप्रमाणे सुरू राहणार आहे.

            यामध्ये संपूर्ण ए, बी वॉर्डातील पुईखडी, कोल्हापूर नगर, सुलोचना पार्क, इंगवले कॉलनी, नाना पाटील नगर, जिवबा नानापार्क, बाबुरावनगर, साळोखेनगर, राजीव गांधी वसाहत, कात्यांनी कॉम्प्लेक्स, तपोवन, देवकर पाणंद, मोरे माने नगर, संभाजीनगर स्टेड, नाळे कॉलनी, बालाजी पार्क, शाहू कॉलनी, कळंबा, पाचगाव, रायगड कॉलनी, जरगनगर, सुभाषनगर, शेंडापार्क, आर.के.नगर, भारती विद्यापीठ, म्हाडा कॉलनी, संभाजीनगर, गंजिमाळ, संपूर्ण शिवाजी पेठ, राजाकपूर पुतळा, संपूर्ण मंगळवार पेठ, पोतनीस बोळ, मंगेशकर नगर, बेलबाग, महालक्ष्मीनगर, सरनाईक वसाहत, त्रिकोणी गॅरेज, नेहरूनगर, वाय.पी.पवार नगर, जवाहरनगर व सलग्नीत ग्रामीण भाग, 
            ई वॉर्ड अंतर्गत संपूर्ण राजारामपुरी, शाहू मिल, शाहूमिल कॉलनी, वैभव होसिंग सोसायटी, ग्रीनपार्क, शांतिनिकेतन, रेवेन्यू कॉलनी, अरुणोदय, राजेंद्रनगर, चौगुले हायस्कूल, सम्राट नगर, प्रतिभानगर, इंगळेनगर, दौलतनगर, उद्यमनगर, शास्त्रीनगर, पांजरपोळ, नवद्या मारुती चौक, दत्तगल्ली, यादव नगर, कामगार चाळ, पंत मंदिर, जगदाळे कॉलनी, महावीरनगर, अश्विनीनगर, जागृतीनगर, पायमल वसाहत, अंबाई डिफेन्स, राजाराम रायफल, काटकर माळ, संपूर्ण ई वॉर्डातील बावडा फिल्टर हाऊसवर अवलंबून असणारा संपूर्ण कसबा बावडा, लाइन बाजार, लोणार वसाहत, राजीव गांधी वसाहत, महाडीक कॉलनी, सुतार कॉलनी, लीशा हॉटेल, सदर बाजार, कदमवाडी, जाधववाडी , बापट कॅम्प, शिवाजी पार्क, फ्रेंड्स कॉलनी, ताराबाई पार्क, नागाळापार्क, रणमाळा, शालिनी पॅलेस, मुक्त सैनिक वसाहत, मार्केट यार्ड, सी.बी.एस. स्टेशन रोड, साईक्स एक्स्टेंशन, न्यू शाहूपुरी, खानविलकर पेट्रोलपंप, शाहूपुरी व्यापारेपेठ,  व्हीनस कॉर्नर, शाहूपुरी १ ते ४ गल्ली, बी.टी.कॉलेज, बापट कॅम्प, संपूर्ण टेंबलाईवाडी, पाच बंगला परिसर इत्यादी परिसरांमध्येही पाणीपुरवठा अपुरा व कमी दाबाने होणार आहे. तरी नागरिकांनी उपलब्ध होणारे पाणी काटकसरीने वापरून कोल्हापूर महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes