Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
पत्रकार समीर देशपांडे यांना सरपंच परिषदेचा राज्यस्तरीय पुरस्कारगोकुळवरून भाजप -राष्ट्रवादीची तोंडे एकमेकांच्या विरोधात ! दोन्ही बाजूंनी स्वतंत्र पॅनेलची मागणी!!आदमापुरात रंगला सामुदायिक लग्नसोहळावीरशैव लिंगायत समाजातर्फे शिव-बसव जयंती उत्साहात साजरीप्राचार्य मधुकर बाचुळकर यांच्या कार्यावर आधारित पुस्तकाचे बुधवारी प्रकाशनशिवसेना ठाकरे पक्षातर्फे खासदार निशिकांत दुबे यांचा निषेध आमदार शिवाजी पाटील यांनी वेळ द्यावा, सगळया मुद्यावर खुलासा करू ! गोकुळचा पैसा दूध उत्पादकांच्या हितासाठीच !! चेअरमन नविद मुश्रीफप्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊसने आता कौशल्य विकास विद्यापीठाकडे वाटचाल करावी - डॉ. सुनीलकुमार लवटेशाळा गुणवत्ता मूल्यांकन- आश्वासन आराखडामध्ये स्वयं मूल्यांकन प्रक्रियेत कोल्हापूर राज्यात तृतीय क्रमांकावरकोल्हापूर शहरातील समस्या दूर करण्याला प्राधान्य द्या- आमदार अमल महाडिक

जाहिरात

 

बाजार समितीच्या तीन संचालकांना भाडेकरार भोवणार ? जिल्हा उपनिबंधकानी मागवली माहिती

schedule13 Apr 26 person by visibility 586 categoryराजकीय

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर  : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या तीन संचालकानी पदाचा गैरवापर करून बाजार समितीच्या मालकीच्या  इमारतीतील जागा नातेवाईकांना भाडेकरारावर दिली असून त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई करावी अशी मागणी शिवसेना ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा उपनिबंधक निळकंठ करे यांच्याकडे केली होती. त्या मागणीच्या अनुषंगाने जिल्हा उपनिबंधक करे यांनी बाजार समितीचे सभापती व सचिव यांच्याकडे त्या तीन संचालकांच्या संदर्भातील वस्तुस्थितीदर्शक अहवाल तत्काळ सादर करावा असा आदेश काढला आहे.
"बाजार समितीच्या इमारतीतील दुसऱ्या मजल्यावरील 4500 चौरस फूट जागा बाजार समितीचे संचालक सुयोग वाडकर, शेखर देसाई व भारत पाटील यांनी नातेवाईकांच्या नावावर  भाडे कराराने दिले आहे. महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी विक्री अधिनियम अन्वये त्या तीन संचालकावर फौजदारी करून त्यांना अपात्र करावे" अशी मागणी शिवसेनेचे उपनेते संजय पवार व सहसंपर्कप्रमुख विजय देवणे यांनी जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे केली होती. 9 एप्रिल रोजी शिवसेनेने तक्रार केली होती. त्या  तक्रारीच्या अनुषंगाने जिल्हा निबंधक करे यांनी, बाजार समितीचे सभापती व सचिव यांना पत्र पाठवले आहे. त्या तीन संचालकांच्या संदर्भातील वस्तुस्थितीदर्शक अहवाल तत्काळ सादर करावा असे पत्रात म्हटले आहे. दरम्यान या संदर्भात बाजार समितीचे सचिव तानाजी दळवी यांच्याशी संपर्क साधण्यासाठी फोन केला मात्र त्यांनी तो उचलला नाही. तर संचालक शेखर देसाई यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, " तत्कालीन सभापती सूर्यकांत पाटील यांनी बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांना मोफत जेवण व राहण्यासाठी माफक दरामध्ये सुविधा उपलब्ध करून देण्याची घोषणा केली होती. त्या अनुषंगाने दुसऱ्या मजल्यावरील जागा भाडे कराराने कायदेशीर प्रक्रिया अंतर्गतच घेतली आहे. शेतकरी, व्यापारी व बाजार समिती संबंधित निगडित घटकांना माफक दरामध्ये राहण्याची सुविधा व्हावी या उद्देशाने त्या जागेवरती सोय करण्यात येणार आहे. सगळ्या बाबी विचारात घेऊनच या प्रक्रिया पूर्ण केलेले आहेत. त्यामध्ये गैर असे काही केले नाही. "

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes