Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
शिक्षक बँकेला तीन कोटीहून अधिक नफा, आठ टक्के लाभांश ! व्यवसाय वृद्धीसाठी संचालक संख्या वाढीचा प्रस्ताव ! !सत्ताधारी संचालकांनी सभासदांची दिशाभूल थांबवावी, गेल्या चार वर्षाची कामगिरी मांडावी ! दोन अंकी लाभांश, एक अंकी व्याजदर केव्हा देणार ते सांगा !!डॉ.डी.वाय. पाटील पॉलिटेक्निकमध्ये गौराई खेळ' स्पर्धा उत्साहातशिवराजे स्पोर्ट्सतर्फे गरीब-होतकरू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटपशिक्षकांच्या प्रश्नांना विधीमंडळात आवाज देण्यासाठी माझी उमेदवारी- प्रा. सचिन सानपलोकसंवाद-२०२६ उपक्रमांतर्गत आष्टा, कसबे डिग्रजमध्ये प्रबोधनजतमध्ये तहसीलदारांनी साधला गणेशभक्तांशी संवाद, महिला सक्षमीकरण, सायबर सुरक्षेबाबत  मार्गदर्शनमानाच्या तुकाराम माळी तालीम मंडळाच्या उद्घाटनाने विसर्जन मिरवणूकीस सुरवातआत्मातर्फे सोमवारी रानभाजी महोत्सव सत्यजीत पाटील गोकुळ निवडणुकीत सतेज पाटलांच्या समविचारी आघाडी सोबत

जाहिरात

 

आत्मातर्फे सोमवारी रानभाजी महोत्सव

schedule25 Sep 26 person by visibility 84 categoryलाइफस्टाइल

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : कोल्हापूरच्या कृषी संस्कृतीला आणि पारंपरिक खाद्यपदार्थांना उजाळा देण्यासाठी कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा, आत्माच्यावतीने सोमवार, 28 सप्टेंबर रोजी सकाळी दहा ते सायंकाळी सहा या वेळेत व्ही. टी. पाटील सभागृह, राजारामपुरी येथे जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सवाचे आयोजन केले आहे

जिल्ह्यातील 100 हून अधिक महिला या महोत्सवातील पाककला स्पर्धेत सहभागी होणार आहेत. या महोत्सवात भाकरी आणि रानभाज्यांपासून बनवलेले खास पदार्थ विक्रीसाठी उपलब्ध असणार आहेत. या महोत्सवात  करटोली, अंबुशी, घोळ, आळू , काटेमाट, कुर्डू , पाथरी, टाकळी, बाबू कोंब,  दिंडा इत्यादी  30 प्रकारच्या रानभाज्या मांडण्यात येणार आहे. महोत्सवात 25 पेक्षा अधिक प्रजातींच्या रानभाज्यांचे प्रदर्शन करण्यात येणार आहे.  जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी, विशेषतः महिला, विद्यार्थी आणि खाद्यप्रेमींनी या अनोख्या महोत्सवात मोठ्या संख्येने उपस्थित राहून रानभाज्यांचे महत्त्व जाणून घ्यावे, असे आवाहन आत्माच्या प्रकल्प संचालक रक्षा शिंदे व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे यांनी  केले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes