शिवराजे स्पोर्ट्सतर्फे गरीब-होतकरू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप
schedule26 Sep 26 person by visibility 119 categoryसामाजिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : गणेशोत्सवाच्या माध्यमातून केवळ धार्मिक उत्सव न करता सामाजिक बांधिलकी जपत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजांना हातभार लावणारा उपक्रम नाळे कॉलनी, सोमराज कॉम्प्लेक्स येथील शिवराजे स्पोर्ट्सचा या मंडळाने केला. उत्सवातील शिल्लक वर्गणीतून पाचगाव येथील जिल्हा परिषद शाळेतील गरीब व होतकरु विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप केले. सामाजिक बांधिलकी आणि समाजभावना जपत शिवराजे स्पोर्ट्सने हा उपक्रम राबविला असे मंडळाचे अध्यक्ष अभिजीत मटकर, उपाध्यक्ष अनंत मोसमकर यांनी सांगितले. गणेशोत्सव झाल्यानंतर मंडळाचे अध्यक्ष मटकर, उपाध्यक्ष मोसमकर व अन्य कार्यकर्त्यांनी, शाळेत जाऊन शैक्षणिक साहित्य वितरीत केले. याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष साताप्पा पाटील, शाळेचे मुख्याध्यापक अशोक पाटील यांच्या उपस्थितीमध्ये विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापकांनी शिवराजे स्पोर्ट्सच्या या सामाजिक उपक्रमाचे कौतुक करून, “या उपक्रमातून इतर मंडळांनीही प्रेरणा घेऊन समाजोपयोगी उपक्रम राबवावेत,” अशी अपेक्षा व्यक्त केली.