Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
शिक्षक बँकेला तीन कोटीहून अधिक नफा, आठ टक्के लाभांश ! व्यवसाय वृद्धीसाठी संचालक संख्या वाढीचा प्रस्ताव ! !सत्ताधारी संचालकांनी सभासदांची दिशाभूल थांबवावी, गेल्या चार वर्षाची कामगिरी मांडावी ! दोन अंकी लाभांश, एक अंकी व्याजदर केव्हा देणार ते सांगा !!डॉ.डी.वाय. पाटील पॉलिटेक्निकमध्ये गौराई खेळ' स्पर्धा उत्साहातशिवराजे स्पोर्ट्सतर्फे गरीब-होतकरू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटपशिक्षकांच्या प्रश्नांना विधीमंडळात आवाज देण्यासाठी माझी उमेदवारी- प्रा. सचिन सानपलोकसंवाद-२०२६ उपक्रमांतर्गत आष्टा, कसबे डिग्रजमध्ये प्रबोधनजतमध्ये तहसीलदारांनी साधला गणेशभक्तांशी संवाद, महिला सक्षमीकरण, सायबर सुरक्षेबाबत  मार्गदर्शनमानाच्या तुकाराम माळी तालीम मंडळाच्या उद्घाटनाने विसर्जन मिरवणूकीस सुरवातआत्मातर्फे सोमवारी रानभाजी महोत्सव सत्यजीत पाटील गोकुळ निवडणुकीत सतेज पाटलांच्या समविचारी आघाडी सोबत

जाहिरात

 

लोकसंवाद-२०२६ उपक्रमांतर्गत आष्टा, कसबे डिग्रजमध्ये प्रबोधन

schedule25 Sep 26 person by visibility 73 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या जिल्हा माहिती कार्यालय, सांगलीच्यावतीने लोकसंवाद उपक्रमांतर्गत आष्टा आणि कसबे डिग्रज येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये नागरिकांशी संवाद साधून प्रबोधन करण्यात आले. आष्टा येथील छत्रपती शिवाजी गणेश तरूण मंडळ आणि शंभुराजे गणेश मंडळ (धनगर गल्ली) येथे तसेच कसबे डिग्रज येथील शिवनेरी मित्र मंडळ येथे आयोजित या उपक्रमास नागरिकांचा चांगला प्रतिसाद लाभला. 

या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मंचावर जिल्हा माहिती अधिकारी संप्रदा बीडकर, कौशल्य विकास विभागाचे संतोष फासे, बार्टीच्या संयोगिता हेरकळ, आष्ट्याचे महसूल सहाय्यक रवींद्र साळुंखे, कोतवाल सुधीर गोंधळी यांनी त्यांच्या विभागाच्या महत्त्वाच्या योजनांची माहिती देऊन लाभ घेण्याचे आवाहन केले. महिलांची सुरक्षितता, रोजगार मिळवण्यासाठीचे उपलब्ध व्यासपीठ, विविध महामंडळे, जात पडताळणी आदिंची माहिती देण्यात आली. याचबरोबर नागरिकांच्या शंकांचे निरसनही करण्यात आले.

कार्यक्रमास कसबे डिग्रजचे योगेश सायमोते, छत्रपती शिवाजी गणेश तरूण मंडळ, आष्टाचे अध्यक्ष संजय जाधव व पदाधिकारी, शंभुराजे गणेश मंडळ, आष्टाचे अध्यक्ष दत्तात्रय कोळेकर व पदाधिकारी आणि शिवनेरी मित्र मंडळ कसबे डिग्रजचे पदाधिकारी, सेतूचालक नितीन खोत व सचिन थोरात आदि उपस्थित होते. यावेळी मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती देण्यात आली. कार्यक्रमास मंडळाचे पदाधिकारी, नागरिक, महिला, गणेशभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.  उपक्रमासाठी आष्ट्याचे अपर तहसीलदार राजशेखर लिंबारे, सांगलीच्या अपर तहसीलदार अश्विनी वरुटे, कौशल् विकासचे सहायक आयुक्त इनुजा शेख, समाजकल्याणचे सहायक आयुक्त बाळासाहेब कामत, बार्टीचे गणेश सवाखंडे यांचे सहकार्य लाभले. 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes