राज्यपालांनी साधला कोल्हापुरात मान्यवरांशी संवाद !
schedule29 Sep 26 person by visibility 44 categoryलाइफस्टाइल
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी कोल्हापूर दौऱ्यात जिल्ह्यातील विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या मान्यवरांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. शासकीय विश्रामगृह येथे ही भेट झाली. राज्यपालांच्या कोल्हापूर दौऱ्याच्या कार्यक्रमात विविध क्षेत्रांतील प्रमुख व्यक्तींचा भेटीमध्ये समावेश होता.
यावेळी कृषी, उद्योग, व्यवसाय आणि वास्तुकला क्षेत्रातील डॉ. संजय डी. पाटील, सर्जेराव पाटील, कोल्हापूर फर्स्टचे प्रमुख सुरेंद्र जैन, नीरज झंवर, मोहन कुशिरे, राजीव पाटील, भरत जाधव, वर्धन वडगावे आणि अजय कोराने यांनी राज्यपालांची भेट घेतली. डॉ. अशोक भूपाळी, डॉ. ए. बी. पाटील, डॉ. सुरज पवार, डॉ. सतीश पत्की, सीए आशिष सेवेकरी, ॲड. श्रीकृष्ण गनबावले, ॲड. राजेंद्र मंडलिक, प्रा जे. के. पवार आणि सागर पाटील यांनीही राज्यपालांशी संवाद साधला. भरत जाधव, तेजस्विनी सावंत, सोनम म्हस्कर, अनिल पवार, विजय जाधव, शेखर जोशी, सचिन जवळकोटे, चंद्रकांत पाटील, मयुरी आळवेकर आणि विजय उपाध्ये यांनी राज्यपालांची भेट घेतली. कोल्हापूरी चप्पल कारागिर शुभम सातपूते यांनी कोल्हापूर चप्पल निर्मिती, विक्री याबाबत सविस्तर माहिती दिली.