गोकुळचे माजी संचालक सत्यजीत सुरेश पाटील यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश
schedule29 Sep 26 person by visibility 100 categoryउद्योग
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी अधकाधिक ठराव आपल्याकडे असावेत यासाठी नेतेमंडळी सरसावले आहेत. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील समविचारी आघाडीही ताकतीने निवडणुकीत उतरली आहे. करवीर तालुक्यातील गोकुळचे माजी संचालक सत्यजीत सुरेश पाटील यांचा मंगळवारी, २९ सप्टेंबर २०२६ काँग्रेस पक्षात प्रवेश झाला. आमदार पाटील यांच्या उपस्थितीमध्ये अजिंक्यतारा कार्यालय येथे हा पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम झाला. याप्रसंगी जिल्हा परिषदेतील गटनेते एकनाथ पाटील, गोकुळचे माजी संचालक बाबासाहेब चौगले, अभिजीत तायशेटे, बयाजी शेळके, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शशिकांत खोत, महापालिकेतील विरोधी पक्षनेते राजेश लाटकर, गटनेते इंद्रजीत बोंद्रे, नगरसेवक राहुल माने, डॉ. के एन पाटील आदी उपस्थित होते.