Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
घरगुती - व्यावसायिक वापराच्या साखरेसाठी वेगवेगळे दर आवश्यक -आमदार अमल महाडिकलग्न ठरवायला मुंबईला गेले अन् मुख्यमंत्री नागपूरला अशी विरोधकांची अवस्था - सतेज पाटलांचा महायुतीला टोलागोकुळचे माजी संचालक सत्यजीत सुरेश पाटील यांचा काँग्रेसमध्ये प्रवेशराज्यपालांच्यासोबत डॉ संजय डी. पाटलांचा संवाद ! कृषी, साखर उद्योग, दूध व्यवसाय, शेतकऱ्यांच्या प्रश्नासंबंधी चर्चा !!पदवीधरांचे रोजगार - आर्थिक प्रश्न घेऊन प्रा. एन. डी. चौगले पदवीधर निवडणुकीच्या मैदानातराज्यपालांनी साधला कोल्हापुरात मान्यवरांशी संवाद ! असोसिएशन ऑफ पॅथॉलॉजिस्टचे ४७ वे वार्षिक मॅपकॉन अधिवेशन कोल्हापुरातअपयशाकडे अपयश म्हणून नको त्यातून शिकण्याची संधी म्हणून पाहा –नेमबाज सोनम मस्करकोरे अभियांत्रिकीच्या सिव्हिल विभागातील विद्यार्थ्यांची दक्षिण आफ्रिकेतील कंपनीत  निवडफुलेवाडी परिसरात बिबट्या, वनविभागाकडून शोध ! पोलिस फौजफाटा तैनात ! !

जाहिरात

 

पदवीधरांचे रोजगार - आर्थिक प्रश्न घेऊन प्रा. एन. डी. चौगले पदवीधर निवडणुकीच्या मैदानात

schedule29 Sep 26 person by visibility 40 categoryलाइफस्टाइल

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : तीन दशकाहून अधिक काळ ते शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत. शिक्षक, प्राध्यापक म्हणून काम केले आहे. संस्थाचालक म्हणून विद्यार्थ्याना शिक्षणाच्या संधी उपलब्ध करुन दिल्या आहेत. सामाजिक संघटना, शैक्षणिक संघटनेतही आघाडीवर आहेत. यामुळे विद्यार्थी, पदवीधर तरुणाईच्या समस्या, शिक्षक प्राध्यापकांची प्रश्ने माहित आहेत. त्यांच्या सोडवणुकीसाठी सरकार दरबारी पाठपुरावा करण्याची तयारी आहे. या साऱ्या बळावर प्रा. एन. डी. चौगले हे पुणे विभागीय पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. पदवीधरांच्या आर्थिक आणि रोजगाराच्या प्रश्नांच्या सोडवणुकीला आपले प्राधान्य राहील अशी हमी त्यांनी दिली आहे.

प्रा. चौगले हे शिवसेना प्रणित शिक्षक आघाडीचे पश्चिम महाराष्ट्र विभागाचे कार्याध्यक्ष आहेत.तसेच पुणे विभागाचे सहसंपर्क प्रमुख आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे, शिवसेनेचे पदाधिकारी संजय मोरे, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, खासदार धैर्यशील माने, आमदार राजेश क्षीरसागर, आमदार चंद्रदीप नरके यांच्या मार्गदर्शनाखाली ते पुणे पदवीधर निवडणूक लढवित आहेत. त्यांनी, निवडणुकीसाठी प्रा. चौगले यांना शुभेच्छा दिल्या आहेत. प्रा चौगले यांनी, समर्थकांसह राजर्षी शाहू महाराज यांच्या समाधीस्थळ अभिवादन करुन प्रचाराला सुरुवात केली आहे.

 पुणे पदवीधर मतदारसंघातून निवडणूक  लढविण्यामागील भूमिका मांडताना ते म्हणाले, ‘तरुणांच्या हाताला रोजगार, अर्थार्जन आणि स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून प्रशासकीय करिअर करू ईच्छिणाऱ्या उमेदवारांना योग्य मार्गदर्शन, वेळेवर परीक्षा झाल्या पाहिजेत, यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. पदवीधरांच्या समोर आज विविध प्रश्ने आहेत. त्यांच्या प्रश्नांची सोडवणूक व्हायला हवी, त्यांचा आवाज म्हणून काम करण्यासाठी आपण ही निवडणूक लढवित आहे. केवळ राजकारणसाठी आपण निवडणूक लढवित नाही. तर पदवीधरांच्या समोरीला आव्हानांची सोडवणूक करुन त्यांना योग्य न्याय देण्यासाठी आपली उमेदवारी आहे.’

 प्रा. चौगले यांनी, महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या अधिकार मंडळावर काम केले आहे. राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कार्यकारी परिषद सदस्य म्हणून काम केल्याचा त्यांना अनुभव आहे. ते सिनेट सदस्य आहेत. सात वर्षे नोकरी केल्यानंतर त्यांनी २५ -२६ वर्षापूर्वी  सरस्वती शिक्षण प्रसारक मंडळ ही शिक्षण संस्था सुरू केली. एन डी चौगले ग्रुप इन्स्टिट्यूटची स्थापना केली. त्यांच्या शिक्षण संस्थेच्या आता चौदा शाखा आहेत. केजी टू पीजी शिक्षणाची सुविधा आहे. शिक्षण क्षेत्रात काम करत असतानाच पदवीधर, शिक्षक व प्राध्यापकांना न्याय मिळवून देण्यासाठी पदवीधर मतदारसंघातून निवडणूक लढवित आहे. मतदारसंघातील पाचही जिल्ह्यात आपला संपर्क आहे.’असे त्यांचे म्हणणे आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes