पश्चिम महाराष्ट्रात वारणा विद्यापीठाच्या कोरे अभियांत्रिकीस सर्वाधिक प्रवेश जागा
schedule03 Aug 26 person by visibility 154 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : यंदाच्या प्रथम वर्ष अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेत पश्चिम महाराष्ट्रातील, नामांकित विद्यापीठाशी संलग्न जुन्या महाविद्यालयापेक्षा तसेच तंत्रज्ञान विद्यापीठाशी संलग्नित अभियांत्रिकी महाविद्यालयापेक्षा, वारणा विद्यापीठाच्या तात्यासाहेब कोरे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी (कोरे अभियांत्रिकी), वारणानगर यास सर्वाधिक ११०२ प्रवेश जागा प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थी व पालकांची प्रथम पसंती पुन्हा एकदा कोरे अभियांत्रिकीला मिळाल्याचे सिद्ध झाले आहे.
प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्याच दिवशी महाविद्यालय परिसरात विद्यार्थी व पालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठी गर्दी केली होती. मेकॅनिकल, सिव्हिल, केमिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, टीसीएस प्रायोजित कॉम्प्युटर सायन्स अँड बिझनेस सिस्टिम्स तसेच सायबर सिक्युरिटी या शाखांमध्ये प्रथम वर्षासाठी प्रवेश निश्चित करणाऱ्या विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे डॉ. व्ही. व्ही. कारजिन्नी यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. याप्रसंगी प्राचार्य, डॉ. के. आय.पाटील, अधिष्ठाता, डॉ. एस. एम. पिसे, ॲडमिशन इन्चार्ज डॉ. ए. व्ही. पाटील, प्रा. राहुल कुंभार, जालिंदर जाधव, विविध विभागांचे विभागप्रमुख, प्राध्यापक व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
या उल्लेखनीय यशाबद्दल वारणा विविध उद्योग व शिक्षण समूहाचे अध्यक्ष डॉ. विनयरावजी कोरे, वारणा विद्यापीठाचे कुलाधिकारी एन. एच. पाटील तसेच वारणा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांनी महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
डॉ. व्ही. व्ही. कारजिन्नी यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे तांत्रिक शिक्षण, अत्याधुनिक प्रयोगशाळा, उद्योगाभिमुख प्रशिक्षण, संशोधन, नवोपक्रम आणि उत्कृष्ट प्लेसमेंटच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी महाविद्यालय सातत्याने प्रयत्नशील आहे. महाविद्यालयाचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे दरवर्षी ६५० हून अधिक विद्यार्थ्यांची विविध राष्ट्रीय व बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये निवड होत असते.