Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
शंभर टक्के निधीसाठी जिप सदस्य भेटले मंत्र्यांना ! मंगळवारी मुंबईत आबिटकर -मुश्रीफांत चर्चा !!केशवराव भोसले नाट्यगृहासह विविध विकासकामांचे ९ ऑगस्टला लोकार्पण, महापौर, आयुक्तांकडून तयारीची पाहणीकेशवराव भोसले नाट्यगृहाचे खासगीकरण नाही, महापालिकेचीच मालकी राहील ! आयुक्तांचे रंगकर्मीना पत्र !!ग्रंथ माणसाला विवेकी बनवतात : डॉ. बी. एम. हिर्डेकरकोल्हापूरच्या जिल्हा माहिती अधिकारीपदी वर्षा पाटोळे रुजूलव्ह जिहाद प्रकरणातील आरोपींवर मोक्काखाली कारवाई करावी- सकल हिंदू समाजाचे एसपींना निवेदनभाजपा उद्योग आघाडीची कोल्हापूरची कार्यकारिणीची घोषणा ! जिल्हाध्यक्षपदी भरत पाटील, शहराध्यक्षपदी धैर्यशील पाटील !!पश्चिम महाराष्ट्रात वारणा विद्यापीठाच्या कोरे अभियांत्रिकीस सर्वाधिक प्रवेश जागाडीवाय पाटील स्कूल ऑफ हॉस्पिटॅलिटीमध्ये प्रथम वर्ष विद्यार्थ्यांचे स्वागतअभियांत्रिकीच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची केआयटीला पसंती ! कालसुसंगत अभ्यासक्रम, शैक्षणिक गुणवत्तेची हमी !!

जाहिरात

 

कोल्हापूरच्या जिल्हा माहिती अधिकारीपदी वर्षा पाटोळे रुजू

schedule03 Aug 26 person by visibility 202 categoryजिल्हा परिषद

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर: कोल्हापूरच्या जिल्हा माहिती अधिकारी या पदाचा पदभार वर्षा पाटोळे यांनी सोमवारी, तीन ऑगस्ट २०२६ स्वीकारला. यापूर्वी त्यांनी नाशिक, धुळे, डहाणू, मुंबई, कोल्हापूर, सांगली, सातारा या ठिकाणी काम केले आहे. जिल्हा माहिती अधिकारी पदासह त्यांच्याकडे कोल्हापूर विभागाच्या उपसंचालक पदाचाही अतिरिक्त कार्यभार आहे.रुजू होताच त्यांनी जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्यासह प्रशासनातील प्रमुख अधिकाऱ्यांची भेट घेतली. पाटोळे यांनी राज्य सरकारच्या माहिती व जनसंपर्क विभागामध्ये विविध जबाबदाऱ्या प्रभावीपणे सांभाळल्या आहेत. शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना, विकासकामे, जनजागृती मोहिमा तसेच जिल्हा प्रशासनाच्या उपक्रमांची माहिती नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी त्यांनी सातत्याने उल्लेखनीय कार्य केले आहे. श्रीमती पाटोळे यांनी  यापूर्वी जिल्हा माहिती अधिकारी म्हणून कोल्हापूर येथे काम केले आहे. कोल्हापूर विभागीय उपसंचालक कार्यालय आणि जिल्हा माहिती कार्यालयामार्फत पुष्पगुच्छ देवून  पाटोळे यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते. 
0000

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes