लव्ह जिहाद प्रकरणातील आरोपींवर मोक्काखाली कारवाई करावी- सकल हिंदू समाजाचे एसपींना निवेदन
schedule03 Aug 26 person by visibility 171 categoryसामाजिक
महाराष्ट्रस न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : हातकणंगले पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या लव्ह जिहाद प्रकरणातील आरोपींवर मोक्काखाली कारवाई करावी. पोलिस प्रशानाकडून या प्रकरणाचा सखोल तपास झाला पाहिजे या मागणीचे निवेदन सकल हिंदू समाजाच्या प्रतिनिधींनी जिल्हा पोलिस अधीक्षक निलोत्पल यांना दिले. या प्रकरणातील आरोपींनी व्हॉटसअप चॅटिगवरुन मराठा समाजाविषयीची जो आक्षेपार्ह मजकूर वापरला , ते अतिशय गंभीर आहे. शिवाय सामाजिक तेढ निर्माण करणारा आहे असे निवेदनात म्हटले आहे. पोलिसांनी 'हेट क्राईम' आणि सामाजिक तेढ निर्माण करण्याचे कडक कायदेशीर कलम लावण्याऐवजी, उलटपक्षी धार्मिक भावना दुखावल्याचे कलम वगळण्यासाठी न्यायालयात अर्ज दिला! पोलिसांची ही भूमिका आरोपींना पाठीशी घालणारी आणि संशयास्पद असल्याचे निवेदनात म्हटले आहे. पीडित तरुणीचे फोटो व व्हिडिओ तपासादरम्यान पाहताना कायद्यानुसार अनिवार्य असलेल्या महिला पंचांना सोबत घेतले गेले नाही. आरोपींच्या मोबाईलमधील डिलीट केलेले फोटो, व्हिडिओ आणि चॅट फॉरेन्सिक टीमद्वारे 'डेटा रिकव्हर करण्याऐवजी पोलिसांनी थेट सोशल मीडिया अकाउंट्स बंद करण्याची विनंती केली. या प्रकरणातील संबंधित तपास अधिकाऱ्यांचे तात्काळ निलंबन करून खातेनिहाय चौकशी व्हावी. शिवाय हा खटला खटला विशेष फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवून विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती करावी.असे निवेदनात म्हटले आहे. शिष्टमंडळात धवलसिंह मोहिते पाटील, दीपक काटे, प्रकाश बेलवाडे, संताजी घोरपडे, व्यंकटेश मोरे, गजानन तोडकर, शिवानंद स्वामी, अनिरुद्ध कोल्हापुरे आदींचा समावेश होता.