Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
शंभर टक्के निधीसाठी जिप सदस्य भेटले मंत्र्यांना ! मंगळवारी मुंबईत आबिटकर -मुश्रीफांत चर्चा !!केशवराव भोसले नाट्यगृहासह विविध विकासकामांचे ९ ऑगस्टला लोकार्पण, महापौर, आयुक्तांकडून तयारीची पाहणीकेशवराव भोसले नाट्यगृहाचे खासगीकरण नाही, महापालिकेचीच मालकी राहील ! आयुक्तांचे रंगकर्मीना पत्र !!ग्रंथ माणसाला विवेकी बनवतात : डॉ. बी. एम. हिर्डेकरकोल्हापूरच्या जिल्हा माहिती अधिकारीपदी वर्षा पाटोळे रुजूलव्ह जिहाद प्रकरणातील आरोपींवर मोक्काखाली कारवाई करावी- सकल हिंदू समाजाचे एसपींना निवेदनभाजपा उद्योग आघाडीची कोल्हापूरची कार्यकारिणीची घोषणा ! जिल्हाध्यक्षपदी भरत पाटील, शहराध्यक्षपदी धैर्यशील पाटील !!पश्चिम महाराष्ट्रात वारणा विद्यापीठाच्या कोरे अभियांत्रिकीस सर्वाधिक प्रवेश जागाडीवाय पाटील स्कूल ऑफ हॉस्पिटॅलिटीमध्ये प्रथम वर्ष विद्यार्थ्यांचे स्वागतअभियांत्रिकीच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची केआयटीला पसंती ! कालसुसंगत अभ्यासक्रम, शैक्षणिक गुणवत्तेची हमी !!

जाहिरात

 

केशवराव भोसले नाट्यगृहाचे खासगीकरण नाही, महापालिकेचीच मालकी राहील ! आयुक्तांचे रंगकर्मीना पत्र !!

schedule03 Aug 26 person by visibility 36 categoryमहानगरपालिका

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या खासगीकरणाच्या विरोधात तीव्र भावना उमटल्यानंतर महापालिका प्रशासनाने अखेर नमते घेतले. ‘नाट्यगृहाचे खासगीकरण होणार नाही. महापालिकेमार्फतच ते चालविले जाईल.’असे पत्रच आयुक्त राजेंद्र भारुड यांनी रंगकर्मींना दिले. तसेच नऊ  ऑगस्टच्या उद्घाटनानंतर या विषयावर रंगकर्मी आणि नागरिकांशी चर्चा करुन याबाबतीत पुढील स्वरुप ठरवण्यात येईल” असे पत्रात म्हटले आहे.

नाट्यगृहाच्या खासगीकरणच्या विरोधात रंगकर्मीनी आंदोलन केले होते. खासदार धनंजय महाडिक यांनी दोनच दिवसापूर्वी,नाट्यगृहाचे खासगीकरण होणार नाही असे स्पष्ट केले होते. दोन वर्षापूर्वी लागलेल्या आगीच्या दुर्घटनेनंतर नाट्यगृहाची नव्याने उभारणी करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नऊ ऑगस्ट रोजी नाट्यगृहाचे उद्घाटन करण्याचे नियोजन सुरू आहे. नाट्यगृहाच्या बांधकामासाठी तत्कालिन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंचवीस लाख रुपयांचा निधी मंजूर केला होता. जिल्ह्यातील आमदार, खासदारांनी नाट्यगृहासाठी निधी दिला.

नाट्यगृहाचे काम अंतिम टप्प्यात आहे. दरम्यान जुलै महिन्यात झालेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत नाट्यगृहाचे व्यवस्थापन बाह्य संस्थेला देण्याचा ठराव मंजूर झाला. महापालिकेच्या या निर्णयाविरोधात उलटसुलट प्रतिक्रिया उमटल्या. रंगकर्मींनी नाट्यगृहाच्या खासगीकरणाला विरोध केला. रंगकर्मीनी नाट्यगृहाबाहेर आंदोलन केले. खासगीकरणाचा निर्णय रेटला तर उद्घाटनच्या कार्यक्रमाव बहिष्कार टाकू, मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात काळे झेंडे दाखवू असा इशारा दिला होता. खासगीकरणावरुन आरोप, प्रत्यारोपही झाले. दोनच दिवसापूर्वी खासदार महाडिक यांनी नाट्यगृहाचे खासगीकरण होणार नाही असे स्पष्ट केले होते. तर भाजपच्या काही नगरसेवकांनी खासगीकरणाचे समर्थन केले होते.

दरम्यान आयुक्त भारुड यांनी, सोमवारी ३ ऑगस्ट रोजी रंगकर्मीशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महापालिकेची भूमिका स्पष्ट केली. ‘नाट्यगृहाचे खासगीकरण होणार नाही. महापालिकेमार्फतच ते चालविले जाईल. नऊ  ऑगस्टच्या उद्घाटनानंतर या विषयावर रंगकर्मी आणि नागरिकांशी चर्चा करुन याबाबतीत पुढील स्वरुप ठरवण्यात येईल” असे पत्र त्यांनी रंगकर्मीनी दिले. महापालिका प्रशासनाने  रंगकर्मीना आंदोलन मागे घ्यावे असे आवाहनही केले आहे.  रंगकर्मी सुनील घोरपडे, अभिनेता आनंद काळे, किरणसिंह चव्हाण, प्रसाद जमदग्नी, रोहन घोरपडे यावेळी उपस्थित होते.

...........

 

पत्रात काय म्हटले.

‘संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाची संपूर्ण मालकी महापालिकेची राहील. कोणत्याही पद्धतीने खासगी मालकी, खासगीकरण होणार नाही. नाट्यगृहाच्या हाऊसकिंपीगसह संपूर्ण सेवांचे व देखभाल दुरुस्तीचे एकाच बाह्ययंत्रणेमार्फत निविदा प्रक्रिया  राबवून केले जाणार आहे. नाट्यगृहाचे बुकिंग पारदर्शकपणे ऑनलाइन पद्धतीने महापालिकेमार्फत केले जाणार आहे.नाट्यगृहामध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या  कार्यक्रमाचे दर व निविदेचा मसुदा याबाबत महापालिका प्रशासन, महापौर, इतर पदाधिकारी यांच्यासमेवत ९ ऑगस्ट २०२६ नंतर चर्चा करुन निश्चित केले जाईल. ’

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes