Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
डीवाय पाटील इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटच्या निकिता-श्रेयसला इंडिया स्किल्स  स्पर्धेमध्ये रौप्यपदकसोनाळीचा दीपक देसाई स्पोर्ट्स ठरला जीपीएलचा मानकरी ! रंगनाथ स्पोर्ट्स उपविजेता!!दिल्लीतील दुग्ध परिषदेत चेतन नरके करणार मार्गदर्शनदोन वर्षातील कामासाठी सात वर्षे विलंब कशासाठी ? राजेश क्षीरसागरांनी अधिकाऱ्यासह ठेकेदारांना खडसावलेगोकुळ कर्मचारी संघटनेकडून सुनिल वाडकरांच्या वक्तव्याचा निषेध; कडक कारवाईची मागणीकुलगुरु निवड लांबली, मुलाखती कधी होणार ? कुलपती कार्यालयाकडे लक्षजिल्हा परिषदेच्या सभेत विषय समित्यांवर सदस्यांच्या निवडीराधानगरी तालुक्यातील अवसायनात संस्थांच्या सुनावणीस गती द्या - अभिजीत तायशेटेकोल्हापुरात बुधवारपासून मिलेटसह फळ महोत्सव कोल्हापूर, सांगलीच्या पोलीस अधीक्षकांची बदली ! निलोत्पल कोल्हापूरचे नवे एसपी, तुषार दोशी सांगलीमध्ये !!

जाहिरात

 

सोनाळीचा दीपक देसाई स्पोर्ट्स ठरला जीपीएलचा मानकरी ! रंगनाथ स्पोर्ट्स उपविजेता!!

schedule21 Apr 26 person by visibility 23 categoryक्रीडा

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी :  भुदरगड प्रेमिअर लीगच्या (जीपीएल) रोमहर्षक अंतिम सामन्यात दीपक देसाई स्पोर्ट्स, सोनाळीने चषक जिंकला. या स्पर्धेतील अंतिम सामना दिपक देसाई स्पोर्टस विरुद्ध रांगणा स्पोर्ट्स, भटवाडी या संघांमध्ये रंगला. शेवटच्या षटकापर्यंत चाललेला हा सामना सर्व प्रेक्षकांसाठी लक्षवेधी ठरला. 

 स्पर्धेचे यंदाचे  १७ वे वर्ष असून यावर्षी तब्बल २० संघानी या स्पर्धेत सहभाग नोंदवला. सलग १५ दिवस सुरु असलेली ही स्पर्धा असून अतिशय नियोजनबद्ध स्पर्धा पार पडली. सुपर आठ नंतर या सामन्याची उत्सुकता वाढत गेली. डे नाईट सामने असल्याने रात्री प्रकाशझोतात प्रेक्षकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात दहा हजार प्रेक्षकांच्या साथीने अंतिम मुकाबला पार पडला. स्पर्धेतील विजेत्या संघांना रुपये १ लाख बक्षीस देण्यात आले. द्वितीय क्रमांकास ७५ हजार तर उत्तेजनार्थ ११ हजार अशी पारितोषिके देण्यात आली.

यावेळी के.डी.सी.सी. बँकेचे संचालक प्राचार्य अर्जुन आबिटकर, गोकुळ दूध संघाचे संचालक नंदकुमार ढेंगे, जिल्हा परिषद सदस्य अरुण जाधव, माजी सभापती बाबा नांदेकर, राहुरी कृषी विद्यापीठाचे संचालक दत्तात्रय उगले, विष्णू केसरकर, भुदरगड तालुक्याचे सभापती विक्रमसिंह पाटील, पंचायत समिती सदस्य धनंजय लाड, अशोक भांदीगरे, प्राचार्य मिलिंद पांगिरेकर, अंकुश चव्हाण, अजित पाटील, तानाजी जाधव य उपस्थित होते.

 स्पर्धा यशस्वी करण्यासाठी कमिटीचे अध्यक्ष बाजीराव चव्हाण, मनोज परीट, विजय सारंग, गजानन शिंदे, सुरेश चव्हाण, सुशांत गुरव, अरुण शिंदे, चंद्रकांत गोरे, दीपक देसाई, एस. के. शिंदे, सागर शिंदे, महेश पवार, रणधीर शिंदे, संजय चिले, संजय पाटील, शंभु चिले, गिरी, रणवीर चव्हाण, नामदेव सावंत, संदीप देसाई आदींनी परिश्रम घेतले

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes