आयटी असोसिएशनतर्फे शुक्रवारी कृतज्ञता कार्यक्रम
schedule22 Apr 26 person by visibility 18 categoryउद्योग
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : राज्य सरकारने, शेंडा पार्क येथे आयटी पार्क साकारण्यासाठी जागा मंजूर केली. याद्वारे कोल्हापुरात आयटी पार्क साकारण्यासाठी महत्वाचे पाऊल पडले आहे. आयटी पार्क होण्यासाठी योगदान देणाऱ्या लोकप्रतिनिधी, अधिकाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यकत् करण्यासाठी आयटी असोसिएशन ऑफ कोल्हापूरतर्फे कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. शुक्रवारी, २४ एप्रिल २०२६ रोजी रेसिडेन्सी क्लब येथे सायंकाळी ५.३० वाजता हा कार्यक्रम होणार आहे. पालकमंत्री प्रकाश आबिटकर, आमदार राजेश क्षीरसागर, आमदार अमल महाडिक महापौर रुपाराणी निकम, जिल्हाधिकारी विजय राठोड, महापालिका आयुक्त राजेंद्र भारुड, एमआयडीचे प्रादेशिक अधिकारी उमेश देशमुख, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अजयकुमार पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम होणार आहे अशी माहिती आयटी असोसिएशनचे अध्यक्ष प्रताप पाटील यांनी दिली आहे.