Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
शैक्षणिक संस्थांमध्ये समुपदेशक नेमण्याची उपजिल्हाधिकाऱ्यांकडे मागणीकौन्सिल ऑफ एज्युकेशनतर्फे शोकसभा,  डॉ. श्रीकृष्ण महाजन यांना श्रद्धांजलीखाजगी शिक्षक सेवक पतसंस्थेतर्फे शिष्यवृत्ती सराव परीक्षा, 1800 विद्यार्थ्यांचा सहभाग गोकुळसंबंधीच्या पत्रकबाजीवरुन राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना भाजपच्या जिल्हाध्यक्षांचा सवालवाचनालय हे गावाच्या उद्धाराचे शक्तिपीठ - माजी कुलगुरू माणिकराव साळुंखेखासगी शिक्षक संघटनांच्यावतीने सीईओ डॉ जस्मिन यांचा सत्कारपीआरएसआय कोल्हापूर चॅप्टरचा उद्घाटन सोहळा दिमाखातप्रा. डॉ. श्रीकृष्ण महाजन यांचे निधनआयटी असोसिएशनतर्फे शुक्रवारी कृतज्ञता कार्यक्रमगोकुळच्या संचालक मंडळावर युनियनचे दोन सदस्य

जाहिरात

 

गोकुळसंबंधीच्या पत्रकबाजीवरुन राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना भाजपच्या जिल्हाध्यक्षांचा सवाल

schedule22 Apr 26 person by visibility 72 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : गोकुळ दूध संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये मंत्री हसन मुश्रीफ यांनी मुख्यमंत्र्यांच्या परवानगीने राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्र पक्षांची संयुक्त पॅनल बनवावे अशी मागणी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक भैया माने व गोकुळचे स्वीकृत संचालक युवराज पाटील यांनी केलेल्या पत्रकबाजीवरुन भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील यांनी सवाल उपस्थित केला. ‘भाजप, शिवसेना, जनसुराज्य यांच्याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसचे अन्य कोणी मित्र पक्ष आहेत का ?  हे पाटील व  माने यांनी जाहीर करावे.’ असे  पाटील यांनी म्हले आहे.

     गोकुळ दूध संघाच्या पंचवार्षिक निवडणुक ही वेगळ्या वळणावर गेली आहे. ११०८ दूध संस्थांचा अवसायनाचा प्रश्न न्यायप्रविष्ठ आहे या संस्थांच्या वतीने मी स्वतः माझ्या मंजुनाथ सहकारी दूध व्यवसायिक संस्थेच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंच मध्ये या संस्थांना मताचा अधिकार प्राप्त व्हावा यासाठी न्यायालयात गेलो आहे. अजून या ११०८ दूध संस्थांच्या सभासदत्वाचा व मताचा अधिकाराचा प्रश्न प्रलंबित असताना या लोकांना या निवडणुकीची घाई का लागली हा प्रश्न या निमित्ताने अधोरेखित होतो कारण या ११०८ दुध संस्था या मताला पात्र होणे अत्यंत आवश्यक आहे .

‘भाजपचे नेते व मंत्री चंद्रकांत पाटील हे भाजपचे आमदार शिवाजीराव पाटील यांच्याशी चर्चा करत महायुतीतील नेत्यांच्या मधील बेबनाव कमी व्हावा यासाठी प्रयत्न करत आहेत अशाप्रसंगी भैय्या माने व युवराज पाटील यांनी यापद्धतीने पत्रक प्रसिद्ध करून या बेबनावाला पुन्हा खतपाणी घालण्याचे काम करू नये. मुळात माने व पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस अन्य मित्र पक्षांना सोबत घेऊन स्वतंत्र पॅनेल करून निवडणूक लढवण्याची परवानगी मुख्यमंत्री कडून घ्यावी अशी मागणी करत आहे पण अशा परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे भाजप , शिवसेना (एकनाथ शिंदे गट ) व जनसुराज्य हे मित्रपक्ष सोडून अन्य कोणी छुपे मित्र पक्ष आहेत का याचा खुलासा करणे आवश्यक आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes