शिवराज्याभिषेकदिनानिमित्त विविध सामाजिक उपक्रम ! व्याख्यानमाला, मिरवणुकीचे आयोजन !!
schedule27 May 26 person by visibility 41 categoryसामाजिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : अखिल भारतीय मराठा महासंघ व मराठा स्वराज्य भवन ट्रस्टच्यावतीने ३५२ वा राज्याभिषेक सोहळा तीस मे ते सहा जून २०२६ या कालावधीत विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे. डॉल्बीमुकत मिरवणूक काढण्यात येणार आहे अशी माहिती मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक व महासंघाचे जिल्हाध्यक्ष शशिकांत पाटील यांनी दिली.
शिवराज्याभिषेक व्याख्यानमालेतंर्गत माजी आमदार उल्हासदादा पवार यांचे ’महाराष्ट्रातील सांस्कृतिक राजकारण’या विषयावर शनिवारी, (३० मे २०२६ ) व्याख्यान आहे. रविवारी, ३१ मे रोजी मुंबई येथील डॉ. दीपक पवार यांचे ’छत्रपती शिवराय आणि आजचा महाराष्ट्र धर्म’या विष्यावर व्याख्यान आहे.दोन्ही व्याख्याने शाहू स्मारक भवन येथे सायंकाळी ५.३० वाजता होणार आहेत. एक जून रोजी सकाळी ११ वाजता शाहू स्मारक भवन येथे फेटा बांधणी प्रशिक्षणआहे. पाच जून रोजी सकाळी दहा वाजता वृक्षारोपन करण्यात येणार आहे.
सहा जून रोजी सायंकाळी ४.३० वाजता शिवराज्याभिषेक मिरवणूक काढण्यात येणार आहे. मंगळवार पेठ येथील मराठा महासंघाच्या कार्यालयापासून मिरवणुकीला प्रारंभ होईल. मिरवणुकीत छत्रपती शिवरायांचा आकर्षक पुतळा असेल. मर्दानी खेळ, महिला लेझीम,वारकरी पथक, झांज पथक,धनगरी ढोल यासह महिला भगवी साडी व पदाधिकारी विशेष पोषाखात सहभागी होणार. मिरवणूक पारंपारिक पद्धतीने डॉल्बीमुक्त असणार आहे.मिरवणूक महासंघ कार्यालय ते कोळेकर तिकटी ते मिरजकर तिकटी तिकटी ते बिनखांबी गणेश मंदिर ते पापाची तिकटी ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे सांगता होईल. पत्रकार परिषदेला महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा शैलजा भोसले, निलेश पाटील, डॉ .संदीप पाटील, बबनराव रानगे, प्रकाश पाटील, कादर मलबारी, चंद्रकांत चव्हाण, शंकरराव शेळके, विजय पाटील, संयोगिता देसाई संपत्ती पाटील विजय पाटील प्रताप नाईक, अशोक माळी आदी उपस्थित होते