Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
कोल्हापूर महापालिकेला मिळणाऱ्या जीएसटी अनुदानात वाढ कराआयटी पार्कची जागा एमआयडीसीच्या ताब्यात, आमदार राजेश क्षीरसागरांचा पाठपुरावाचित्रपट महामंडळाच्या निवडणुकीसाठी मतदान केंद्राची संख्या वाढवावी - मेघराज राजेभोसलेकृष्णराज महाडिकांनी घेतली पोलिस महासंचालकांची भेट, महत्वपूर्ण विषयासंबंधी निवेदन सादरशिक्षक - कर्मचाऱ्यांना पूर्वीचीच वैद्यकीय प्रतिपूर्ती योजना  चालू ठेवा सतेज पाटलांनी काय करावे हा त्यांचा प्रश्न, आम्ही महायुती म्हणून गोकुळची निवडणूक लढविणार - हसन मुश्रीफशिवराज्याभिषेकदिनानिमित्त विविध सामाजिक उपक्रम ! व्याख्यानमाला, मिरवणुकीचे आयोजन !!अण्णासाहेब पाटील महामंडळला हजार कोटींचा निधी द्या, अन्यथा हलगी बजाव आंदोलनलिंगायत माळी समाजातर्फे तेरा जूनला विद्यार्थी गुणगौरव, पुरस्कार वितरण समारंभ शिक्षकांच्या प्रश्नांची आठ दिवसात सोडवणूक करा, अन्यथा जिल्हा परिषदेसमोर साखळी उपोषण

जाहिरात

 

शिक्षकांच्या प्रश्नांची आठ दिवसात सोडवणूक करा, अन्यथा जिल्हा परिषदेसमोर साखळी उपोषण

schedule27 May 26 person by visibility 374 categoryशैक्षणिक

शिक्षक संघातर्फे  जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन, राजाराम वरुटेंनी दिला इशारा

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक ( माजी आमदार शिवाजीराव पाटील ) संघातर्फे शिक्षकांच्या विविध प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी सोमवारी, २५ मे २०२६ जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन करण्यात आले. शिक्षक नेते राजाराम वरुटे यांनी, ‘येत्या आठ दिवसात प्रशासनाकडून शिक्षकांच्या प्रश्नांची सोडवणूक करावी, अन्यथा शिक्षक संघातर्फे जिल्हा परिषदेसमोर साखळी उपोषण करणार’असा इशारा दिला.

’२४ वर्षानंतरची निवडश्रेणी प्रस्तावास त्वरित मंजुरी मिळावी, ५५ वर्षानंतरच्या मुदतवाढीच्या प्रस्तावास मंजुरी, शैक्षणिक अर्हता वाढविण्यासाठी बहिस्थ परिक्षेस बसण्याच्या प्रस्तावास मान्यता, सर्व संवर्गाच्या पदोन्नत्या सेवा ज्येष्ठनेते व्हाव्यात, कुमार कन्या शाळा एकत्रिकरणामध्ये  ज्या शाळांमध्ये मंजूर शिक्षक संख्या कमी होते त्या शाळांचे एकत्रीकरण करू नये’अशा विविध मागण्यासाठी आंदोलन पुकारले होते.  

 शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष बबन केकरे, सरचिटणीस डी. पी. पाटील कोषाध्यक्ष सर्जेराव सुतार, कार्याध्यक्ष भैरवनाथ शिंदे, शिक्षक बँकेचे माजी बजरंग लगारे, अध्यक्ष नामदेव रेपे, प्रशांत पोतदार, बाजीराव कांबळे, बी. एस. पाटील, रवींद्र नागटिळे, श्रीपती तेली, वसंत जाधव, जी. एस. पाटील, दिलीप पाटील, शिवाजी पाटील, बाजीराव पाटील, अनिल चौगले, बाबा साळोखे, साहेब शेख, श्रीकांत चव्हाण, दत्तात्रय एकशिंगे, उत्तम पाटील, संजय ठाणेकर, राजेंद्र मांडेकर, संभाजी पाटील, रवींद्र धुरुगडे, दस्तगीर फकीर, प्रकाश पाटील, महादेव कुंभार, साताप्पा चौगले, राजेंद्र कांबळे, मारुती दिंडे, विजय मालाधारी, बबलू वडर, संदीप पाडळकर, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा श्वेता खांडेकर, महिला आघाडीच्या जिल्हा सरचिटणीस स्मिता डिग्रजे, नीता निटवे, नीता ठाणेकर आदींचा सहभाग होता.

धरणे आंदोलनस्थळी आमदार जयंत आसगावकर, जिल्हा परिषद अध्यक्षा शिल्पा खोत, उपाध्यक्ष तानाजी पाटील, बांधकाम समिती सभापती सारिका नांदेकर, शिक्षक नेते एस डी लाड यांनी भेट दिली. शिक्षण समिती सभापती शितल यादव, प्राथमिक शिक्षणाधिकारी मीना शेंडकर व शिक्षक संघाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या चर्चेदरम्यान, ‘जिल्हा परिषद स्तरावरील पाच प्रश्नांची सोडवणूक लवकर करू’अशी ग्वाही शिक्षण समिती सभापती यादव यांनी दिली. या बैठकीवेळी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र सुर्यवंशी, एकनाथ पाटील, अरुण जाधव, प्रवीण यादव उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes