राज्य गुणवंत कामगार असोसिएशनचे कार्य उल्लेखनीय - जिल्हाधिकारी संतोष पाटील
schedule15 Jul 26 person by visibility 32 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : राज्य गुणवंत कामगार असोसिएशनतर्फे सरकारी निर्णय २०२५ मधील नमूद तरतूदींना अनुसरून केलेल्या लेखी पत्रव्यवहारास व पाठपुराव्याच्या अनुषंगाने सातारा जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या हस्ते जिल्ह्यातील पात्र गुणवंत कामगारांची विशेष कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली. याप्रसंगी त्यांनी, राज्य गुणवंत कामगार असोसिएशनचे कार्य उल्लेखनीय व कौतुकास्पद असल्याचे सांगितले.
राज्य गुणवंत कामगार असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष सुरेश केसरकर यांच्या मार्गदर्शनाखाली समाजातील सर्वच क्षेत्राप्रती विविध पातळीवर भरीव कार्य सुरू असल्याचे मान्वरांनी नमूद केले. असोसिएशनचे साताऱ्याचे जिल्हाध्यक्ष अशोकराव जाधव, जिल्हा कार्याध्यक्ष गजानन घाडगे व विभागीय सदस्य शंकरराव मांढरे यांचाही पाठपुरावा असतो.- संजय गिरी, चंद्रकांत लोहार, प्रजय राऊत, संजय पवार, विठ्ठल तांबे, महेंद्र धनवे व आनंदा पाटील प्रमाणपत्र, ओळखपत्र व शिक्के प्रदान करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील नितिन मतकर (महसूल सहाय्यक) व दीपक गुरव (महसूल सहाय्यक) हे उपस्थित होते. या कार्यक्रमास गुणवंत कामगार प्रतिष्ठान, साताराचे संस्थापक दिलीपराव चरेगावकर व गोपाळराव खजुरे यांची विशेष उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या सुरुवातीला असोसिएशन सातारा जिल्हाध्यक्ष अशोकराव जाधव यांच्यातर्फे जिल्हाधिकारी पाटील, तहसिलदार वैभव पिलारे यांचा प सत्कार करण्यात आला.