Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
राष्ट्रीय बास्केटबॉलसह पाच राज्यस्तरीय स्पर्धांच्या आयोजनाचा कोल्हापूर जिल्ह्याला मानवाशीचे सामाजिक कार्यकर्ते सरदार रानगेंचा भाजपात प्रवेशडीवाय पाटील मेडिकल कॉलेजच्या एमबीबीएस प्रवेश क्षमतेत ५० जागांची वाढआषाढी वारीत कुलगुरू, प्रकुलगुरू ! शिवाजी विद्यापीठातर्फे स्वच्छतेतून सेवाभाव ! !कोल्हापुरात शुक्रवारी आयटी निर्यात शिखर परिषद, दिल्लीचे डॉ. अभय सिन्हा प्रमुख मार्गदर्शकराज्य गुणवंत कामगार असोसिएशनचे कार्य उल्लेखनीय - जिल्हाधिकारी संतोष पाटीलवारी आनंदाची ! कोल्हापूर जिल्हा परिषदेची हमी शुद्ध पाणी पुरवठ्याची !!अमर रहे अमर रहे - लाटकर काका अमर रहे ! राष्ट्र सेवादलाकडून मानवंदना, शोकाकूल वातावरणात भरत लाटकरांना अखेरचा निरोप  कार्यरत शिक्षकांसाठी स्वतंत्र टीईटीचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन ! तर सेवाज्येष्ठ शिक्षक पदोन्नतीस पात्र !! राष्ट्रसेवा दलाचे माजी अध्यक्ष भरत लाटकर यांचे निधन

जाहिरात

 

कोल्हापुरात शुक्रवारी आयटी निर्यात शिखर परिषद, दिल्लीचे डॉ. अभय सिन्हा प्रमुख मार्गदर्शक

schedule15 Jul 26 person by visibility 31 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर आणि पश्चिम महाराष्ट्रातील तंत्रज्ञान क्षेत्रासाठी अंत्यत उपयुक्त अशी ‘कोल्हापूर आयटी निर्यात शिखर परिषद २०२६’चे आयोजन १७ जुलै २०२६ रोजी आयोजित केले आहे. आयटी असोसिएशन ऑफ कोल्हापूरतर्फे आयोजित या परिषदेला नवी दिल्ली येथील सर्व्हिसेस एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिलचे महासंचालक डॉ. अभय सिन्हा हे प्रमुख मार्गदर्शक आहेत. कोल्हापुरातील हॉटेल मराठा रिजेन्सी येथे दुपारी चार वाजता ही परिषद होणार आहे. या परिषदेत सर्व्हिसेस एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिलचे प्रादेशिक संचालक विवेक बक्षी, निर्यात विभागाचे वरिष्ठ सल्लागार  श्रीजीत नायर, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अजयकुमार पाटील हे परिषदेत मार्गदर्शन करणार आहेत. कोल्हापुरातील सॉफ्टवेअर आणि आयटी कंपन्यांना जागितक बाजारपेठेत झेप घेता यावी हा या परिषद आयोजनामागील मुख्य उद्देश आहे. अशी माहिती कोल्हापूर आयटी असोसिएशनचे अध्यक्ष प्रताप पाटील, सचिव राहूल मेंच यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes