Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
केआयटी कॉलेजमध्ये प्रथम वर्ष ‘इंडक्शन प्रोग्राम २०२६-२७’ उत्साहातगोकुळच्या 25 जागेसाठी भाजप उमेदवारी अर्ज दाखल करणार ! निवडणूक महायुती म्हणून एकत्र लढणार !!शिक्षण उपसंचालक सुभाष चौगुले यांना पितृशोकडॉ विलास व्ही. कारजिन्नी यांना सीनियर इंजिनिअर ऑनर २०२६ पुरस्कारलिपिकाकडून मुख्याध्यापकांना अपमानास्पद वागणूकराज कोरगावकर, अश्किन आजरेकरचे मुंबईतील स्पर्धेत यशजर्मनीतील प्लांटिक्स कंपनीच्या प्रतिनिधीची बाजार समितीला भेटमृत्युंजयकार शिवाजीराव सावंत यांना अभिवादनमी मंडळे तोडणारा नव्हे तर जोडणारा कार्यकर्ता –आमदार राजेश क्षीरसागरपाणीपट्टी वसुलीसाठी महापालिकेची धडक मोहीम; महिन्यात ५३ लाखाची वसुली ! ६५ नळ कनेक्शन बंद; ६ अनधिकृत कनेक्शनला ब्रेक !!

जाहिरात

 

राष्ट्रीय बास्केटबॉलसह पाच राज्यस्तरीय स्पर्धांच्या आयोजनाचा कोल्हापूर जिल्ह्याला मान

schedule15 Jul 26 person by visibility 315 categoryक्रीडा

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : क्रीडा क्षेत्राची समृद्ध परंपरा लाभलेल्या कोल्हापूर जिल्ह्याला २०२६-२७ या शैक्षणिक वर्षात राष्ट्रीय व राज्यस्तरीय शालेय क्रीडा स्पर्धांच्या आयोजनाचा बहुमान मिळाला आहे. जिल्ह्यात १७ वर्षांखालील मुलांच्या राष्ट्रीय शालेय बास्केटबॉल स्पर्धेसह बास्केटबॉल, व्हॉलीबॉल, शालेय फुटबॉल, कबड्डी आणि शालेय हॉकीच्या राज्यस्तरीय स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहेत. दरम्यान, राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी होणाऱ्या सर्व खेळाडूंना यंदापासून वय पडताळणी चाचणी करणे अनिवार्य करण्यात आले आहे. 

 २०२६-२७ मधील शालेय क्रीडा स्पर्धांच्या आयोजन व नियोजनासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा क्रीडा परिषदेची बैठक जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्या अध्यक्षतेखाली झाली. कोल्हापूर जिल्ह्याला यंदा १७ वर्षांखालील मुलांच्या राष्ट्रीय शालेय बास्केटबॉल स्पर्धेच्या आयोजनाचा मान मिळाला आहे. त्याचबरोबर पाच राज्यस्तरीय शालेय क्रीडा स्पर्धाही जिल्ह्यात होणार आहेत. यामध्ये १९ वर्षांखालील मुला-मुलींची बास्केटबॉल स्पर्धा, १७ वर्षांखालील मुला-मुलींची व्हॉलीबॉल स्पर्धा, १४, १७ व १९ वर्षांखालील मुलांची शालेय फुटबॉल स्पर्धा, कबड्डी तसेच १९ वर्षांखालील मुला-मुलींची शालेय हॉकी स्पर्धा यांचा समावेश आहे.

 राज्यस्तरीय स्पर्धांच्या संभाव्य तारखा निश्चित करण्यात आल्या आहेत. व्हॉलीबॉल स्पर्धा २७ ते ३० ऑक्टोबर २०२६ या कालावधीत आदर्श विद्यानिकेतन, मिणचे, ता. हातकणंगले येथे होणार आहे. राज्यस्तरीय शाळेय बास्केटबॉल स्पर्धा १ ते ४ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत कोल्हापूर बास्केटबॉल असोसिएशन, शिवाजी विद्यापीठ परिसर येथे, तर राज्यस्तरीय शालेय फुटबॉल स्पर्धा १२ ते १६ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत महाराष्ट्र हायस्कूल, कोल्हापूर येथे आयोजित करण्यात येणार आहे. राज्यस्तरीय शालेय हॉकी स्पर्धा २५ ते २७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम, दि डिस्ट्रिक्ट हॉकी असोसिएशन, कोल्हापूर येथे होणार आहे. यात राष्ट्रीय स्तर बास्केटबॉल तारखा निश्चित करण्यात आल्या आहेत. मात्र यात इतर स्पर्धेतील तारखांमध्ये बदल होण्याची शक्यता आहे.

 

 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes