Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
शंभर टक्के निधीसाठी जिप सदस्य भेटले मंत्र्यांना ! मंगळवारी मुंबईत आबिटकर -मुश्रीफांत चर्चा !!केशवराव भोसले नाट्यगृहासह विविध विकासकामांचे ९ ऑगस्टला लोकार्पण, महापौर, आयुक्तांकडून तयारीची पाहणीकेशवराव भोसले नाट्यगृहाचे खासगीकरण नाही, महापालिकेचीच मालकी राहील ! आयुक्तांचे रंगकर्मीना पत्र !!ग्रंथ माणसाला विवेकी बनवतात : डॉ. बी. एम. हिर्डेकरकोल्हापूरच्या जिल्हा माहिती अधिकारीपदी वर्षा पाटोळे रुजूलव्ह जिहाद प्रकरणातील आरोपींवर मोक्काखाली कारवाई करावी- सकल हिंदू समाजाचे एसपींना निवेदनभाजपा उद्योग आघाडीची कोल्हापूरची कार्यकारिणीची घोषणा ! जिल्हाध्यक्षपदी भरत पाटील, शहराध्यक्षपदी धैर्यशील पाटील !!पश्चिम महाराष्ट्रात वारणा विद्यापीठाच्या कोरे अभियांत्रिकीस सर्वाधिक प्रवेश जागाडीवाय पाटील स्कूल ऑफ हॉस्पिटॅलिटीमध्ये प्रथम वर्ष विद्यार्थ्यांचे स्वागतअभियांत्रिकीच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची केआयटीला पसंती ! कालसुसंगत अभ्यासक्रम, शैक्षणिक गुणवत्तेची हमी !!

जाहिरात

 

अण्णा भाऊ साठेंच्या साहित्यात मानवतेसाठी जगणाऱ्या माणसाची कहाणी - प्रा. जयसिंग दिंडे

schedule03 Aug 26 person by visibility 71 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांनी साहित्यातून मानवतेसाठी जगणारा खंदा माणूस उभा केला. त्यांचे जीवन संघर्षमय आणि वेदनेने भरलेले होते.साहित्याच्या सर्व प्रकारात त्यांनी मुशाफिरी केली. त्यांनी साहित्यातून समता, स्वातंत्र्य, बंधुता तसेच मानवतेसाठी  झटणाऱ्या माणसााची कहानी मांडली.’असे मत न्यू कॉलेजचे प्रा जयसिंग दिंडे यांनी व्यक्त केले. कोल्हापूर महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण कॉलेजमध्ये लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी अण्णा भाऊ साठे यांच्या  साहित्यिक व्यक्तिमत्वाची ओळख करुन देणाऱ्या भित्तीपत्रिकाचे उद्घाटन आणि ग्रंथ प्रदर्शन भरविले होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. दिंडे उपस्थित होते. त्यांनी भाषणातून, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जीवनकार्याचाा आढावा घेतला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कॉलेजचे प्रभारी प्राचार्य डॉ. प्रशांत नागावकर होते.प्रा. डॉ. व्ही. बी. शिंदे यांनी प्रास्ताविक केले. प्रा. छाया माळी यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. अस्मिता लवेकर यांनी आभार मानले. मराठी विभागातर्फे वाचन लेखन प्रेरणा दिनाचे आयोजन केले होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes