Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
कोल्हापूरच्या औद्योगिक भरारीला महानिर्यात इग्नाईटची साथआरोग्यमंत्र्याची संकल्पना, कोल्हापुरात पायलट प्रोजेक्ट! एक हजार मोफत शस्त्रक्रिया! ! राजर्षी शाहू मिल येथे आंतरराष्ट्रीय स्मारकाचा आराखडा लवकरच उच्चस्तरीय समितीकडे: राजेश क्षीरसागरश्री गजानन नागरी सहकारी पतसंस्थेच्या नूतनीकरण इमारतीचे शनिवारी उद्घाटनकंत्राटी वैद्यकीय अधिकाऱ्यावर सेवेतून कार्यमुक्तीची कारवाईइंडिया माईस जीवनगौरव पुरस्काराने डॉ. संजय डी. पाटील यांचा सन्मान कोल्हापूर सारस्वत विकास मंडळातर्फे रविवारी खाद्य महोत्सव- कलाकुसरीच्या वस्तूंचे प्रदर्शन न्यू कॉलेजच्या कँपसमध्ये अवतरलीय ग्रामीण संस्कृती! बाजरीचा केक, गुळांबा, वाळवण पदार्थआता लढाई गोकुळसाठी, निवडणुकीचे वाजले बिगुलशिक्षकांच्या फरक बिलाची रक्कम शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडे

जाहिरात

 

राजर्षी शाहू मिल येथे आंतरराष्ट्रीय स्मारकाचा आराखडा लवकरच उच्चस्तरीय समितीकडे: राजेश क्षीरसागर

schedule26 Feb 26 person by visibility 55 categoryमहानगरपालिका

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी: राजर्षी शाहू मिल येथे आंतरराष्ट्रीय स्मारकाचा आराखडा लवकरच उच्चस्तरीय समितीकडे सादर होणार आहे अशी माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष व आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिली. आताच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात कोल्हापूर येथील छत्रपती शाहू मिल येथे मंजूर राजर्षी शाहू महाराजांचे आंतरराष्ट्रीय स्मारक उभारून परिसर सुशोभित करण्याच्या दृष्टीने आवश्यक प्रस्ताव तात्काळ मागवून घेवून त्यास महाराष्ट्र राज्य अर्थसंकल्प २०२६ मध्ये निधीची तरतूद करावी, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती, अशी माहिती आमदार क्षीरसागर यांनी दिली आहे. सद्यस्थितीत वस्त्रोद्योग विभागाने स्मारकाबाबत सर्वसमावेशक आराखडा बनवलेला आहे. सदरचा आराखडा कोल्हापुरातील प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या समोर सादर केला जाणार आहे. त्याबाबतची बैठक लवकरच वस्त्रोद्योग विभाग बोलवणार असून यानंतर हा प्रस्ताव शासनाच्या उच्चस्तरीय समितीकडे सादर होणार असल्याने, राजर्षी शाहू मिल येथे राजर्षी शाहू महाराजांचे आंतरराष्ट्रीय स्मारक होण्याच्या दृष्टीने सकारात्मक पाऊल पडले असल्याचे क्षीरसागर यांनी म्हटले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes