Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
कोल्हापूरच्या औद्योगिक भरारीला महानिर्यात इग्नाईटची साथआरोग्यमंत्र्याची संकल्पना, कोल्हापुरात पायलट प्रोजेक्ट! एक हजार मोफत शस्त्रक्रिया! ! राजर्षी शाहू मिल येथे आंतरराष्ट्रीय स्मारकाचा आराखडा लवकरच उच्चस्तरीय समितीकडे: राजेश क्षीरसागरश्री गजानन नागरी सहकारी पतसंस्थेच्या नूतनीकरण इमारतीचे शनिवारी उद्घाटनकंत्राटी वैद्यकीय अधिकाऱ्यावर सेवेतून कार्यमुक्तीची कारवाईइंडिया माईस जीवनगौरव पुरस्काराने डॉ. संजय डी. पाटील यांचा सन्मान कोल्हापूर सारस्वत विकास मंडळातर्फे रविवारी खाद्य महोत्सव- कलाकुसरीच्या वस्तूंचे प्रदर्शन न्यू कॉलेजच्या कँपसमध्ये अवतरलीय ग्रामीण संस्कृती! बाजरीचा केक, गुळांबा, वाळवण पदार्थआता लढाई गोकुळसाठी, निवडणुकीचे वाजले बिगुलशिक्षकांच्या फरक बिलाची रक्कम शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडे

जाहिरात

 

कोल्हापूरच्या औद्योगिक भरारीला महानिर्यात इग्नाईटची साथ

schedule26 Feb 26 person by visibility 29 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी :  कोल्हापूर जिल्ह्यातील उद्योजक आणि निर्यातदारांना जागतिक बाजारपेठेची कवाडे खुली करून देण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्राच्या वतीने आयोजित 'महानिर्यात इग्नाईट कन्व्हेन्शन २०२६' कार्यशाळा राजर्षी शाहू सभागृह, सर्किट हाऊस येथे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात  झाली. या कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना जिल्हाधिकाऱ्यांनी कोल्हापूर जिल्ह्याने मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेअंतर्गत राज्यामध्ये ९२ टक्के प्रगतीसह अग्रस्थान पटकावल्याबद्दल सर्वांचे अभिनंदन केले. तसेच जिल्ह्याचे १०० टक्के उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी बँकांनी प्रलंबित प्रकरणांवर तात्काळ निर्णय घेऊन सहकार्य करावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

कोल्हापूरच्या समृद्ध वारशाला जागतिक ओळख मिळवून देण्यासाठी भौगोलिक मानांकन प्राप्त उत्पादनांच्या निर्यातीवर जिल्हाधिकाऱ्यांनी विशेष भर दिला. यामध्ये प्रामुख्याने कोल्हापुरी गुळ, चप्पल आणि चांदी उद्योगाची गुणवत्ता सुधारून त्यांच्या विक्रीत वाढ करण्यासाठी उद्योजक आणि औद्योगिक संघटनांनी सामूहिक प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. केवळ शहरापुरते मर्यादित न राहता चंदगड, शाहूवाडी आणि गगनबावडा यांसारख्या दुर्गम भागातील नाचणी, रताळे यांसारख्या स्थानिक उत्पादनांवर प्रक्रिया उद्योग निर्माण करून ती निर्यातक्षम बनवण्यासाठी विशेष पावले उचलली जावीत, असे मत त्यांनी व्यक्त केले. 

उद्योजकांच्या सोयीसाठी उद्योग विभागाने सुरू केलेल्या 'मैत्री कायद्या'ची माहिती देताना जिल्हाधिकारी म्हणाले की, एकाच छताखाली सर्व परवानग्या  वेळेत देण्यासाठी 'मैत्री पोर्टल' कार्यान्वित केले असल्याचे त्यांनी सांगितले . याप्रसंगी योगेश कुलकर्णी यांनी केंद्र व राज्य सरकारच्या विविध विभागांच्या तब्बल २९९० योजनांची माहिती संकलित केलेल्या पुस्तिकेचे प्रकाशन जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आले, जी उद्योजकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.

 कार्यक्रमाला उद्योग सहसंचालक संदीप रोकडे, भारतीय पोस्ट सेवेचे वरिष्ठ अधीक्षक वैभव वाघमारे, एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी उमेश देशमुख, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक मंगेश पवार, आयडीबीआय कॅपिटलचे मुकुंद तिवारी आणि डीजीएफटी सल्लागार अक्षय कोकणे यांची प्रमुख उपस्थिती होती. कोल्हापूर फर्स्टचे सुरेंद्र जैन, आयटी असोसिएशनचे अध्यक्ष प्रताप पाटील, इंजिनिअरिंग असोसिएशनचे कमलकांत कुलकर्णी, शिरोली असोसिएशनचे जयदीप चौगुले, स्मॅक एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिलचे आय. ए. पाटील, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अजयकुमार पाटील, व्यवस्थापक विकास कुलकर्णी व बालाजी बिराजदार  उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes