श्री गजानन नागरी सहकारी पतसंस्थेच्या नूतनीकरण इमारतीचे शनिवारी उद्घाटन
schedule26 Feb 26 person by visibility 185 categoryउद्योग
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : सर्वसामान्यांना आधार देणारी पतसंस्था म्हणून लौकिक असलेल्या श्री गजानन नागरी सहकारी पतसंस्थेच्या प्रधान कार्यालय व पाटोळेवाडी शाखा इमारतीचे नूतनीकरण केले आहे.नूतनीकरण केलेल्या या इमारतीचा उद्घाटन समारंभ, शनिवारी (२८ फेब्रुवारी २०२६) आयोजित केला आहे अशी माहिती पतसंस्थेचे संस्थापक राजाराम बा. पाटोळे व चेअरमन किरण बळवंत पाटोळे यांनी पत्रकार परिषदेत दिली. पतसंस्थेच्या प्रधान कार्यालय येथे हा समारंभ होत आहे.
‘जिल्हा उपनिबंधक निळकंठ करे यांच्या हस्ते सकाळी ११ वाजता उद्घाटन समारंभ आहे. याप्रसंगी नूतन नगरसेवक प्रमोद देसाई, राजनंदा महाडिक, विजयेंद्र माने, प्राजक्ता जाधव यांचा सत्कार करण्यात येणार आहे. तत्पूर्वी सकाळी ९ वाजता रक्तदान शिबिर होणार आहे. तसेच सभासद व ग्राहकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केले आहे. १९८९ मध्ये पतसंस्थेची स्थापना झाली. पतसंस्थेच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांचे जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न केला आहे.’असे संस्थापक राजाराम पाटोळे यांनी सांगितले.
पतसंस्थेचे चेअरमन किरण पाटोळे म्हणाले, लहानसहान व्यावसायिक, बचत गटापासून ते दुचाकी -चारचाकी वाहन खरेदी, ट्रक खरेदी, घर बांधणीसाठी कर्ज पुरवठा केला जातो. आतापर्यंत ७० कोटी रुपयांचे कर्ज वाटप केले आहे.पतसंस्था सध्या शंभर कोटीच्या ठेवीकडे वाटचाल करत आहेत. संस्थेच्या पाच शाखा आहेत. ठेवीदार व ग्राहकांसाठी विविध प्रकारच्या ठेव योजना असून त्यावर आकर्षक व्याज दिला जातो. एक मार्च ते ३१ मार्च २०२६ या कालावधीत तेरा महिन्यासाठी ठेवीच्या रक्कमेवर अकरा टक्के व्याज दिला जाणार आहे. आहे. ’पत्रकार परिषदेला पतसंस्थेचे जनरल मॅनेजर राहुल तरवडेकर, अकौटंट श्रीकांत देसाई, अभय मिराशी उपस्थित होते.