Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
कोल्हापूरच्या औद्योगिक भरारीला महानिर्यात इग्नाईटची साथआरोग्यमंत्र्याची संकल्पना, कोल्हापुरात पायलट प्रोजेक्ट! एक हजार मोफत शस्त्रक्रिया! ! राजर्षी शाहू मिल येथे आंतरराष्ट्रीय स्मारकाचा आराखडा लवकरच उच्चस्तरीय समितीकडे: राजेश क्षीरसागरश्री गजानन नागरी सहकारी पतसंस्थेच्या नूतनीकरण इमारतीचे शनिवारी उद्घाटनकंत्राटी वैद्यकीय अधिकाऱ्यावर सेवेतून कार्यमुक्तीची कारवाईइंडिया माईस जीवनगौरव पुरस्काराने डॉ. संजय डी. पाटील यांचा सन्मान कोल्हापूर सारस्वत विकास मंडळातर्फे रविवारी खाद्य महोत्सव- कलाकुसरीच्या वस्तूंचे प्रदर्शन न्यू कॉलेजच्या कँपसमध्ये अवतरलीय ग्रामीण संस्कृती! बाजरीचा केक, गुळांबा, वाळवण पदार्थआता लढाई गोकुळसाठी, निवडणुकीचे वाजले बिगुलशिक्षकांच्या फरक बिलाची रक्कम शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडे

जाहिरात

 

इंडिया माईस जीवनगौरव पुरस्काराने डॉ. संजय डी. पाटील यांचा सन्मान

schedule26 Feb 26 person by visibility 34 categoryलाइफस्टाइल

महाराष्ट्र न्यूज वन  : हॉस्पिटॅलिटी आणि पर्यटन क्षेत्रात अतुलनीय योगदान देणारे डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील यांना  'इंडिया माईस जीवनगौरव' पुरस्कारने सन्मानित करण्यात आले. पुणे येथे झालेल्या 'इंडिया माईस अवार्ड’  सोहळ्यात उदयपुर राजघराण्याच्या निवृत्ती कुमारी मेवाड यांच्या हस्ते डॉ.  पाटील यांना गौरविण्यात आले. त्याचबरोबर हॉटेल सयाजीचे व्यवस्थापकिय संचालक रौफ धनानी आणि कोल्हापूरमधील हॉटेल सयाजी यांनाही यावेळी  सन्मानित करण्यात आले. 

भारतातील पहिले आणि एकमेव 'माईस' पर्यटन मासिक असलेल्या 'ट्रॅव्हटूर माईस गाईड' कडून या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केले जाते.या कार्यक्रमात कोल्हापूरमध्ये हॉटेल सयाजी या पंचतारांकित हॉटेलच्या माध्यमातून, खानपान, निवास,  पर्यटन व आदरातिथ्य क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय पाटील यांचा  जीवनगौरव पुरस्काराने गौरव करण्यात आला. उदयपूरच्या निवृत्ती कुमारी मेवाड यांच्या हस्ते  डॉ. पाटील यानी हा पुरस्कार स्वीकारला.  यावेळी आयोजक 'ट्रॅव्हटूर माईस गाईड'चे संपादक अरविंद शर्मा यांची प्रमुख उपस्थिती होती.  या सोहळ्यात सयाजी हॉटेलचे एमडी रौफ धनानी यांना ‘हॉटेलियर ऑफ द इयर’ सन्मान प्रदान करण्यात आला. त्याचबरोबर हॉस्पीटलिटी क्षेत्रात कोल्हापूरची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या सयाजी हॉटेलचा 'बेस्ट बिझनेस हॉटेल इन महाराष्ट्र’ पुरस्काराने गौरव करण्यात आला.   

 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes