Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
महापालिकेत आता प्रभाग समिती सभापतिपदासाठी धुमशानसर्किट बेंचमध्ये गोकुळविषयी पुढील सुनावणी २७ -२८ एप्रिलला, दुग्ध विभागाकडे दूध संस्थांच्या सुनावणी शिवाजी विद्यापीठ कर्मचारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी दिपक काशीद, उपाध्यक्षपदी राकेश डोंगरेशिक्षण सेवकांना सानुग्रह अनुदानबाबत सरकारकडे प्रस्ताव पाठविणार- शिक्षण संचालक शरद गोसावीपटपडताळणीस शैक्षणिक व्यासपीठ - मुख्याध्यापक संघाचा तीव्र विरोधब्राह्मण महासंघाच्यावतीने रविवारी ब्राह्मण शेतकरी मेळावासमरजितसिंह घाटगेंची भाजपमध्ये पुन्हा वापसी !- आता कुठलेही प्रयोग करायचे नाहीत, जे पक्ष सांगेल ते काम करणार! ! कोल्हापूरसाठी बेस्ट सेवासुविधा देण्याला प्राधान्य - आयुक्त राजेंद्र भारुडसामान्य कुटुंबातील पोरीने एमपीएससीतून एकावेळी दोन पोस्ट मिळवल्या ! सेंट्रिग काम करणारा बाप, शेतमजूर आईचे फेडले पांग !!ङङक्षथछ तत

जाहिरात

 

सर्किट बेंचमध्ये गोकुळविषयी पुढील सुनावणी २७ -२८ एप्रिलला, दुग्ध विभागाकडे दूध संस्थांच्या सुनावणी 

schedule09 Apr 26 person by visibility 47 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघासंदर्भात दाखल याचिकेवरील सुनावणीत सर्किट बेंच कोल्हापूरने  राज्य सरकारला प्रतिज्ञातापत्र सादर करण्याचे आदेश दिले आहेत. कोर्टाने, म्हटले आहे की संचालक अपात्र संदर्भातील प्रतिज्ञापत्र २१ एप्रिलला तर १२०० संस्था संदर्भातील प्रतिज्ञापत्र २२ एप्रिला सादर करावेत. तसेच संचालक अपात्रतेसंदर्भातील सुनावण २७ एप्रिल तर १२०० संस्थांच्या संदर्भातील सुनावणी २८ एप्रिल रोजी होणार आहे.

दरम्यान सहायक निबंधक दुग्ध विभागाने अवसायानातील प्राथमिक दूध संस्थांना नोटिसा पाठवून सुनावणी सुरू केल्या आहेत. मंगळवारी आणि बुधवारी १०७ दूध संस्थांच्या सुनावणी पूर्ण झाल्या. यामध्ये आजरा तालुक्यातील ७७ तर  करवीरमधील ३० संस्थांचा समावेश आहे. आतापर्यंत सात तालुक्यातील ५७२ प्राथमिक दूध संस्थांना त्यांचे म्हणणे मांडण्यासंबंधी नोटिसा पाठविल्या आहेत. गडहिंग्लज तालुक्यातील ७४ संस्थांना २० एप्रिलपर्यंत म्हणणे सादर करावे लागणार आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes