Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
शिवाजी विद्यापीठ कर्मचारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी दिपक काशीद, उपाध्यक्षपदी राकेश डोंगरेशिक्षण सेवकांना सानुग्रह अनुदानबाबत सरकारकडे प्रस्ताव पाठविणार- शिक्षण संचालक शरद गोसावीपटपडताळणीस शैक्षणिक व्यासपीठ - मुख्याध्यापक संघाचा तीव्र विरोधब्राह्मण महासंघाच्यावतीने रविवारी ब्राह्मण शेतकरी मेळावासमरजितसिंह घाटगेंची भाजपमध्ये पुन्हा वापसी !- आता कुठलेही प्रयोग करायचे नाहीत, जे पक्ष सांगेल ते काम करणार! ! कोल्हापूरसाठी बेस्ट सेवासुविधा देण्याला प्राधान्य - आयुक्त राजेंद्र भारुडसामान्य कुटुंबातील पोरीने एमपीएससीतून एकावेळी दोन पोस्ट मिळवल्या ! सेंट्रिग काम करणारा बाप, शेतमजूर आईचे फेडले पांग !!ङङक्षथछ ततग्रामीण जीवन समृद्ध करण्यात आनंदराव पाटील -चुयेकरांचा मोठा वाटा : चेअरमन नविद मुश्रीफ    सीईओंकडून विभागांची अचानक पाहणी! अधिकाऱ्यांना सूचना, कर्मचाऱ्यांची उडाली धांदल !!

जाहिरात

 

समरजितसिंह घाटगेंची भाजपमध्ये पुन्हा वापसी !- आता कुठलेही प्रयोग करायचे नाहीत, जे पक्ष सांगेल ते काम करणार! !

schedule08 Apr 26 person by visibility 223 categoryराजकीय

महाराष्ट्र न्यूज वन : विधानसभेच्या २०२४ मधील निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचा झेंडा हाती घेणारे शाहू ग्रुपचे प्रमुख समरजितसिंह घाटगे यांची भारतीय जनता पक्षात पुन्हा घरवापसी झाली. भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार धनंजय महाडिक, माजी आमदार प्रकाश आवाडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये घाटगे यांनी कार्यकर्त्यांसह मुंबईत कमळ हाती घेतले. प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी घाटगे व त्यांच्या कार्यकर्त्यांचे स्वागत केले. ‘घाटगे यांच्या प्रवेशामुळे पक्षाची ताकत वाढली आहे. त्यांचा योग्य सन्मान राखला जाईल. ते ज्या विश्वासाने पक्षात दाखल झाले आहेत, त्यांच्या विश्वासाला कुठेही तडा जाणार नाही.’अशी ग्वाही दिली. शाहू ग्रुपचे प्रमुख समरजितसिंह घाटगे म्हणाले, ‘भारतीय जनता पक्षात गेल्यावर्षीच प्रवेश करायचा निर्णय झाला होता. आतापर्यंत काही प्रयोग केले, येथून पुढे आता कोणताही प्रयोग करायचा नाही. प्रयोगाला आता स्कोप नाही. पक्ष म्हणून भाजप जे काम सांगेल, जी जबाबदारी सोपवेल ती साऱ्यांनी मिळून नेटाने पार पाडायची आहे.’असे त्यांनी कार्यकर्त्यांनी आश्वस्त केले.घाटगे यांच्यासोबतच भाजपमध्ये कागल पंचायत समितीचे सभापती सुवर्णा पाटील, नगरपालिकेचे उपाध्यक्ष जयवंत रावण, कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती कृष्णात पाटील,  जिल्हा परिषद सदस्या  शिवानी भोसले, कागल पंचायत समिती सदस्य अनिलकुमार हेगडे ,रंजना अस्वले, कागल नगरपालिका नगरसेवक दिपक मगर , कागल नगरपालिका शिक्षण समिती सभापती अरुण गुरव, महिला बालकल्याण समितीचे सभापती सारिका बारड, नगरसेविका  साधना पाटील, नगरसेवक सुशांत कालेकर, उमेश सावंत, बाळासो माळी, मेघा माने ,आनंदा पसारे, विजय राजिगरे, हमिदवाडा साखर कारखाना संचालक कैलास जाधव, बोरवडे ग्रामपंचायतचे सरपंच संभाजी फराकटे यांनी प्रवेश केला.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes