Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
शिवाजी विद्यापीठ कर्मचारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी दिपक काशीद, उपाध्यक्षपदी राकेश डोंगरेशिक्षण सेवकांना सानुग्रह अनुदानबाबत सरकारकडे प्रस्ताव पाठविणार- शिक्षण संचालक शरद गोसावीपटपडताळणीस शैक्षणिक व्यासपीठ - मुख्याध्यापक संघाचा तीव्र विरोधब्राह्मण महासंघाच्यावतीने रविवारी ब्राह्मण शेतकरी मेळावासमरजितसिंह घाटगेंची भाजपमध्ये पुन्हा वापसी !- आता कुठलेही प्रयोग करायचे नाहीत, जे पक्ष सांगेल ते काम करणार! ! कोल्हापूरसाठी बेस्ट सेवासुविधा देण्याला प्राधान्य - आयुक्त राजेंद्र भारुडसामान्य कुटुंबातील पोरीने एमपीएससीतून एकावेळी दोन पोस्ट मिळवल्या ! सेंट्रिग काम करणारा बाप, शेतमजूर आईचे फेडले पांग !!ङङक्षथछ ततग्रामीण जीवन समृद्ध करण्यात आनंदराव पाटील -चुयेकरांचा मोठा वाटा : चेअरमन नविद मुश्रीफ    सीईओंकडून विभागांची अचानक पाहणी! अधिकाऱ्यांना सूचना, कर्मचाऱ्यांची उडाली धांदल !!

जाहिरात

 

कोल्हापूरसाठी बेस्ट सेवासुविधा देण्याला प्राधान्य - आयुक्त राजेंद्र भारुड

schedule08 Apr 26 person by visibility 47 categoryमहानगरपालिका

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : आयुक्त म्हणून काम करताना कोल्हापूरसाठी बेस्ट सेवा देण्याचा प्रयत्न करू अशी ग्वाही महापालिकेचे नूतन आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांनी दिली. डॉ. भारुड यांनी, मंगळवारी (सात एप्रिल २०२६) कोल्हापुरात दाखल झाले. कोल्हापुरात पोहोचल्यानंतर त्यांनी, करवीर निवासिनी अंबाबाई देवीचे दर्शन घेतले. त्यानंतर महापालिकेत येऊन त्यांनी, के. मंजुलक्ष्मी यांच्याकडून कार्यभार घेतला.

महापौर रुपाराणी निकम यांची भेट घेऊन महापालिकेच्या विविध विषयांवर चर्चा केली. यावेळी परिवहन समिती सभापती सत्यजित जाधव उपस्थित होते. त्यानंतर आयुक्त डॉ.राजेंद्र भारुड यांनी आयुक्त कार्यालयातील मीटिंग हॉलमध्ये सर्व विभाग प्रमुखांसोबत बैठक घेऊन विविध विभागांच्या कामकाजाची माहिती घेतली. बैठकीस अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ व शिल्पा दरेकर, उपआयुक्त परितोष कंकाळ व किरणकुमार धनवाडे, सहायक आयुक्त उज्वला शिंदे व स्वाती दुधाणे, सहा. संचालक (नगररचना) प्रशांत भोसले, शहर अभियंता रमेश मस्कर,  जल अभियंता हर्षजीत घाटगे, मुख्य लेखापरीक्षक कलावती मिसाळ, लेखापाल संजय सरनाईक, प्रशासन अधिकारी डी.सी. कुंभार, उप-शहर रचनाकार एन.एस. पाटील आदी उपस्थित होते.

प्रसारमाध्यमाच्या प्रतिनिधीशी बोलताना आयुक्त भारुड यांनी, ‘शहरवासियांशी निगडीत मूलभूत प्रश्नांच्या सोडवणुकीला प्राधान्य राहील. रस्ते, ड्रेनेज, पंचगंगा नदी प्रदूषण मुक्ती असे विविध विषय आहेत. महापालिकेकडून, नागरिकांच्या अपेक्षा मोठया असतात. महापालिकेसमोर आव्हाने अनेक आहेत. कोल्हापुरात भाविक व पर्यटकांची संख्या मोठी आहे. त्यांच्या वाहतुकीचा, पार्किंगचा विषय आहेत. त्या अनुषंगाने सुविधा निर्माण करण्याला प्राधान्य राहील. येथे आलेल्या भाविक व पर्यटकांना दोन दिवस शहरात थांबता यावे या पद्धतीने सुविधा निर्माण व्हायला पाहिजेत. वेगळया संकल्पना घेऊन काम करावे लागणार आहे. प्राणिसंग्रहालय व इतर वेगळया गोष्टी कराव्या लागतील. लोकप्रतिनिधी व प्रशासन हे दोन्ही घटक एकत्र काम करत कोल्हापूरसाठी बेस्ट सेवासुविधा देण्याचा आपला प्रयत्न राहील.’ शहरातील वाढत्या अतिक्रमणावर बोलताना आयुक्त म्हणाले, ‘हा विषय संवेदनशील असला तरी तो सोडवावा लागेल. कायद्यानुसार कारवाई करावी लागेल.’

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes