Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
अध्यक्ष - उपाध्यक्षांनी घेतली काँग्रेसच्या सदस्यांची भेट, सोमवारी महायुतीची बैठकट्रॅक्टर ट्रॉली अंगावर, साखर कारखान्याच्या दोघा कर्मचाऱ्यांचा मृत्यूशाळांच्या स्वच्छतागृहांच्या सफाईसाठी ग्रामपंचायतींना पत्र द्या, पुरोगामी शिक्षक संघटनेचे सीईओंना निवेदनविकासकामांना विलंब खपवून घेणार नाही, आमदार राजेश क्षीरसागरांनी अधिकाऱ्यांना सुनावले खडेबोलराष्ट्रीय महिला कलाकार कार्यशाळेचे दिमाखात उद्घाटन, तीन दिवस  विविध कार्यक्रमडॉ. पी. एम. चौगुले लिखित औषधांच्या पलीकडे : एक सायकियाट्रिस्टची यशोगाथा पुस्तकाचे रविवारी प्रकाशनरिक्षा व्यावसायिकांचे सोमवारी रिक्षा बंद आंदोलन, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनेमंत्री -आमदारांच्या निधीच्या अट्टाहासामुळे जिल्हा परिषद सदस्यावर उपोषणाची वेळ, काँग्रेसचा हल्लाबोलकोल्हापुरातील तालमीत साकारणार पैलवान ग्रंथालय, शनिवारी पुस्तक भेट- लोगो अनावरणाचा कार्यक्रम! नव्या निवडीत महापौरपदी मूळ ओबीसींना संधी  ! की दाखले काढणाऱ्यांची चलती ?

जाहिरात

 

ट्रॅक्टर ट्रॉली अंगावर, साखर कारखान्याच्या दोघा कर्मचाऱ्यांचा मृत्यू

schedule20 Nov 26 person by visibility 36 categoryगुन्हे

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर -:  कागल तालुक्यातील सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याच्या दोन कर्मचाऱ्यांचा अपघाती मृत्यू झाला. रस्त्यावरील ट्रॅक्टर ट्रॉलीचा हूक तुटून ट्रॉली अंगावर गेल्याने झालेल्या अपघातामध्ये दोन कर्मचाऱ्यांना जीव गमवावा लागला. दरम्यान अपघाताचे वृत्त समजताच मंत्री हसन मुश्रीफ यांनी पूर्वनियोजित कार्यक्रम रद्द करुन घटनास्थळी धाव घेतली. अपघाताची सविस्तर माहिती घेतली. तसेच  मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.

सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याच्या कर्मचाऱ्यांचा धामणे–पिंपळगाव मार्गावर ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर-ट्रॉलीखाली सापडून  अपघात झाला.यामध्ये  महादेव दिनकर करवळ, (वय ५० रा सोनारवाडी) व बचाराम शिवाजी सुतार   (वय- ६५ रा. मिणचे खुर्द ) यांचा मृत्यू झाला. अपघातामुळे दोन कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला.

दरम्यान मंत्री मुश्रीफ यांनी घटनास्थळी भेट देऊन मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी कारखाना व्यवस्थापन, कामगार संघटना आणि विमा कंपनीच्या माध्यमातून तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.मृत करवळ यांच्या कुटुंबीयांना  पाच लाख रुपये, तसेच भविष्य निर्वाह निधी (पीएफ) मार्फत पाच लाख रुपये अशी एकूण दहा लाख रुपयांची मदत दिली जाईल. तर सुतार यांच्या कुटुंबीयांना कारखाना व्यवस्थापनाकडून पाच लाख रुपये देण्यात येणार असून, विमा कंपनीमार्फतही नियमानुसार जास्तीत जास्त आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes