गोकुळमध्ये बहुमत समविचारी आघाडीलाच, अध्यक्ष निवडीत घोळ घातल्यास रस्त्यावर उतरून लढाई करू
schedule04 Nov 26 person by visibility 272 categoryउद्योग
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : ' गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीमध्ये दूध उत्पादकानी समविचारी आघाडीला स्पष्ट बहुमत दिली आहे. समविचारी आघाडीचे तेरा संचालक आहेत. अध्यक्षपदासाठी शशिकांत पाटील चुयेकर यांचे नाव निश्चित केले आहे. तेव्हा 10 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या अध्यक्षपदाच्या निवडीच्या सभेला महायुतीतील संचालकांनी उपस्थित राहून समविचारी आघाडीला पाठिंबा द्यावा' असे आवाहन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी केले. समविचारी आघाडीचे बहुमत असतानाही अध्यक्षपदाच्या निवडीत घोळ घालून डावलण्याचा प्रकार झाल्यास रस्त्यावर उतरून लढाई कर, न्यायासाठी कायदेशीर मार्गाचाही अवलंब करू' असा इशारा आमदार पाटील यांनी दिला. हॉटेल सयाजी त येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी हा इशारा दिला.
गोकुळ दूध संघाच्या अध्यक्ष निवडीसाठी 10 नोव्हेंबर रोजी संचालकांची पुन्हा सभा होणार आहे. 29 ऑक्टोबर रोजी झालेल्या अध्यक्षपदाच्या निवडीच्या सभेला महायुतीचे 12 संचालक गैरहजर होते. सभेचा कोरम पूर्ण होण्यासाठी 14 संचालकांची उपस्थिती आवश्यक आहे. मात्र 29 ऑक्टोबर रोजी झालेल्या सभेला समविचारी आघाडीचे 13 संचालक हजार होते.
गोकुळच्या संदर्भात सध्या सुरू असलेल्या राजकीय घडामोडी च्या अनुषंगाने बोलताना आमदार सतेज पाटील म्हणाले गोकुळच्या निवडणुकीमध्ये दूध उत्पादकाने समविचारी आघाडीला स्पष्ट बहुमत दिले आहे. दूध उत्पादकांचे हित हाच आमचा अजेंडा आहे. आमच्याकडे स्पष्ट बहुमताचा विचार करून अध्यक्ष पदाच्या निवडीच्या प्रक्रियेतील सभेला महायुतीच्या संचालकाने सहभागी व्हावे. निवडणुकीचा निकाल जाहीर झाला त्याच दिवशी मी घोषित केले आहे की दूध उत्पादकांचे हित व गोकुळ साठी 25 संचालकांनी एकत्र येऊन काम करावे. माझी लढाई ही दूध उत्पादकांना न्याय मिळवून देण्याची आहे. ना माझा मुलगा संचालक आहे, ना मुलाला मी चेअरमन करणार आहे.' असेही पाटील यांनी स्पष्ट केले.