Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
सतेज पाटलांची गोकुळबद्दलची भावना लोकशाहीसाठी कमी अन स्वतःच्या राजकीय सुलभतेसाठी अधिक- महायुतीचा टोला शासन नियुक्त संचालक संख्येवरून सतेज पाटलांचा हल्लाबोल, गोकुळमध्ये कौल आमच्याच बाजूनेकोल्हापूरच्या विकासासाठी महापालिकेस भरघोस निधी देऊ - खासदार धनंजय महाडिकपवित्र पोर्टल शिक्षक भरती प्रक्रियेबाबत संस्थाचालकांना मार्गदर्शनवारणा विद्यापीठाचा पहिला युवा महोत्सव फुलला विद्यार्थ्यांच्या कलाविष्कारांनी जिल्हा परिषदेत दिवाळी महोत्सव, ३२ महिला बचत गटांचा सहभागजिप कर्मचारी सोसायटीच्या तज्ज्ञ संचालकपदी अनिता कांबळेआम्हीही जिल्हा परिषद सदस्य, आम्हालाही हवा समान निधी ! काँग्रेस सदस्य सरसावले, पालकमंत्र्यांना भेटणार ! !शालेय व्हॉलीबॉल स्पर्धेत मुलींच्या गटात कोल्हापूर, तर मुलांच्या गटात पुणे विभाग विजेता !गोकुळच्या अध्यक्ष निवडीसाठी दहा नोव्हेंबरला सभा, संचालकांना आजच सभेचे नोटीस पाठवणार

जाहिरात

 

कोल्हापूरच्या विकासासाठी महापालिकेस भरघोस निधी देऊ - खासदार धनंजय महाडिक

schedule03 Nov 26 person by visibility 85 categoryमहानगरपालिका

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर -: ‘ केंद्रात, राज्यात सत्ता असल्यामुळे कोल्हापूरच्या विकासासाठी महापालिकेला भरघोस निधी उपलब्ध होईल.’अशी ग्वाही खासदार धनंजय महाडिक यांनी दिली.

६० लाख रुपयांचा निधी खर्चून बनवलेल्या जुना वाशी नाका ते बुवा चौक रस्त्याच्या लोकार्पण समारंभ प्रसंगी ते बोलत होते. कोल्हापुरातील उभा मारुती चौक ते साने गुरुजी वसाहत हा ग्रामीण भाग आणि उपनगराला जोडणारा महत्त्वाचा रस्ता आहे. या रस्त्यासाठी उपमहापौर अक्षय जरग, माजी नगरसेवक उत्तम कोराणे, माजी उपमहापौर विक्रम जरग यांनी खासदार धनंजय महाडिक तसेच आमदार राजेश क्षीरसागर यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्यानंतर ड्रेनेजच्या कामासाठी आमदार क्षीरसागर यांच्याकडून २० लाख, तर जुना वाशी नाका ते बुवा चौक, खंडोबा तालीम इथल्या रस्त्यासाठी खासदार धनंजय महाडिक यांच्या निधीतून ६० लाख रुपये देण्यात आले. त्यातून दर्जेदार रस्ता तयार झाला. या रस्त्याचे लोकार्पण खासदार  महाडिक यांच्या हस्ते आणि भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाड़िक, उपमहापौर  जरग, नगरसेवक अजय इंगवले, नगरसेविका अर्चना कोराणे, पूर्वा राणे, प्रसाद चव्हाण, शिवसेना जिल्हा प्रमुख सुजित चव्हाण, भाजपा राज्य कार्यकारिणी सदस्य महेश जाधव यांच्या उपस्थितीत झाले.

खासदार महाडिक, मंत्री हसन मुश्रीफ आणि आमदार क्षीरसागर यांच्याकडून निधी उपलब्ध करुन घेतला. त्यातून प्रभागाच्या विकासासाठी प्रयत्न केल्याचे माजी नगरसेवक उत्तम कोराणे यांनी सांगितले. तर खराब रस्त्यामुळे रहिवासी, व्यावसायिक, वाहनध़ारक त्रस्त होते. त्यांना न्याय देण्याची भूमिका बजावल्याचे माजी उपमहापौर विक्रम जरग यांनी सांगितले. यावेळी माजी महापौर बाजीराव चव्हाण, आर. डी. पाटील, वस्ताद पंडितराव पोवार, अभिजीत वणिरे, बबन मोरे, वस्ताद मनोज बालिंगेकर,अॅड. योगेश साळोखे, सचिन पोवार, संग्राम जरग, सुधीर राणे, राहुल इंगवले, विश्‍वास पोवार, ओंकार जोशी, निखिल कोराणे, शीतल शेळके उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes