जिप कर्मचारी सोसायटीच्या तज्ज्ञ संचालकपदी अनिता कांबळे
schedule02 Nov 26 person by visibility 118 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी सोसायटीच्या तज्ज्ञ संचालकपदी अनिता हिरामणी कांबळे यांची निवड करण्यात आली. कांबळे, या कागल पंचायत समितीमधील ग्रामपंचायत विभागात ग्रामपंचायत अधिकारी आहेत. जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी सोसायटीच्या संचालकांची ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी बैठक झाली. यामध्ये सोसायटीच्या तज्ज्ञ संचालकपदी कांबळे यांची निवड झाली. सोसायटीचे चेअरमन जितेंद्र वसगडेकर, व्हाईस चेअरमन जयकुमार रेळेकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संचालक मंडळाची बैठक झाली.