Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
सतेज पाटलांची गोकुळबद्दलची भावना लोकशाहीसाठी कमी अन स्वतःच्या राजकीय सुलभतेसाठी अधिक- महायुतीचा टोला शासन नियुक्त संचालक संख्येवरून सतेज पाटलांचा हल्लाबोल, गोकुळमध्ये कौल आमच्याच बाजूनेकोल्हापूरच्या विकासासाठी महापालिकेस भरघोस निधी देऊ - खासदार धनंजय महाडिकपवित्र पोर्टल शिक्षक भरती प्रक्रियेबाबत संस्थाचालकांना मार्गदर्शनवारणा विद्यापीठाचा पहिला युवा महोत्सव फुलला विद्यार्थ्यांच्या कलाविष्कारांनी जिल्हा परिषदेत दिवाळी महोत्सव, ३२ महिला बचत गटांचा सहभागजिप कर्मचारी सोसायटीच्या तज्ज्ञ संचालकपदी अनिता कांबळेआम्हीही जिल्हा परिषद सदस्य, आम्हालाही हवा समान निधी ! काँग्रेस सदस्य सरसावले, पालकमंत्र्यांना भेटणार ! !शालेय व्हॉलीबॉल स्पर्धेत मुलींच्या गटात कोल्हापूर, तर मुलांच्या गटात पुणे विभाग विजेता !गोकुळच्या अध्यक्ष निवडीसाठी दहा नोव्हेंबरला सभा, संचालकांना आजच सभेचे नोटीस पाठवणार

जाहिरात

 

पवित्र पोर्टल शिक्षक भरती प्रक्रियेबाबत संस्थाचालकांना मार्गदर्शन

schedule03 Nov 26 person by visibility 80 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : पवित्र पोर्टल अंतर्गत २०२५ मधील शिक्षक भरती प्रक्रियेतील मुलाखतीसह पदभरतीबाबत जिल्हा परिषद कोल्हापूरच्या माध्यमिक शिक्षण विभागातर्फे संस्थाचालक व मुख्याध्यापकांना भरती प्रक्रियेच्या पुढील कार्यवाहीबाबत मार्गदर्शन करण्यात आले. माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी सुवर्णा  सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली उपशिक्षणाधिकारी अजय पाटील यांनी पवित्र पोर्टलवरील शिक्षक भरती प्रक्रियेची माहिती दिली. ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी प्रसिद्ध झालेल्या यादीच्या अनुषंगाने संस्थास्तरावर करावयाची कार्यवाही, मुलाखतीसह पदभरतीची प्रक्रिया आणि त्यासाठी आवश्यक असलेल्या नियम व मार्गदर्शक सूचनांविषयी त्यांनी मार्गदर्शन केले.यावेळी राहुल मसणे यांनी  शिक्षक भरती प्रक्रियेतील पुढील टप्पे नियमानुसार व निर्धारित वेळेत पूर्ण करण्यासंबंधीची माहिती दिली. पवित्र पोर्टलद्वारे राबविण्यात येणारी शिक्षक भरती प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने पूर्ण करण्याच्या दृष्टीने या बैठकीत मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी विस्तार अधिकारी डी. ए. पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes