राज्य तंत्रशिक्षण मंडळाकडून कोरे डिप्लोमाला अतिशय उत्कृष्ट मानांकन
schedule08 Jul 26 person by visibility 19 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर :महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ, मुंबई यांच्या शैक्षणिक वर्ष २०२५-२६ च्या शैक्षणिक अवेक्षण प्रक्रियेमध्ये तात्यासाहेब कोरे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी (डिप्लोमा), वारणानगरने शैक्षणिक गुणवत्तेची परंपरा कायम राखली. संस्थेच्या स्थापत्य अभियांत्रिकी, विद्युत अभियांत्रिकी, यांत्रिकी अभियांत्रिकी आणि संगणक विज्ञान व अभियांत्रिकी या सर्व विभागांना 'अतिशय उत्कृष्ट' असे मानांकन प्राप्त झाले आहे.
महाविद्यालयातील दर्जेदार अध्यापन, आधुनिक प्रयोगशाळा, विद्यार्थीकेंद्रित शिक्षणपद्धती, नियमित शैक्षणिक उपक्रम, उद्योगाभिमुख प्रशिक्षण, उत्कृष्ट निकाल आणि गुणवत्ता वृद्धीसाठी सातत्याने राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची दखल घेत महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाने हे मानांकन प्रदान केले आहे. या यशाबद्दल श्री वारणा विविध उद्योग व शिक्षण समूहाचे अध्यक्ष डॉ. विनयरावजी कोरे यांनी संस्थेचे अभिनंदन करत भविष्यातही गुणवत्ता वृद्धीसाठी सातत्याने कार्य करण्याचे आवाहन केले. तसेच श्री वारणा विभाग शिक्षण मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. व्ही. व्ही. कार्जीनी यांनी सर्व शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थ्यांचे कौतुक केले. या मानांकनामुळे तात्यासाहेब कोरे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी (डिप्लोमा), वारणानगरने शैक्षणिक क्षेत्रातील आपले स्थान अधिक भक्कम केले असून, गुणवत्तापूर्ण तांत्रिक शिक्षण देणारी अग्रगण्य संस्था म्हणून पुन्हा एकदा आपली ओळख अधोरेखित केली आहे.