Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
संस्थेच्या नावांनी बनावट नियुक्ती आदेश, पाच जणांविरोधात पोलिसात गुन्हा दाखलविवेकानंद कॉलेजच्या प्राचार्यपदी डॉ. मिलिंद हुजरेराज्य तंत्रशिक्षण मंडळाकडून कोरे डिप्लोमाला अतिशय उत्कृष्ट मानांकनगोकुळ जपू या - गोकुळ वाढवू या, डॉ. युवराज येंडुरेंच्या नेतृत्वाखालील आत्मक्लेश आंदोलनात शेतकरीही सहभागी  जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीच्या चेअरमनपदी बाजीराव पाटीलकोल्हापूर - सांगलीसह चार जिल्ह्यातील खाजगी रुग्णालयांची विशेष तपासणी; नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाईआषाढी वारीसाठी जिल्हा परिषदेचे वैद्यकीय मदत पथक सज्ज, औषध किटसह पथक आळंदीसाठी रवाना!शहीद वीरपत्नी लक्ष्मी महाविद्यालयात इंडक्शन प्रोग्राम, विद्यार्थिनींच्या कलागुणांना लाभले व्यासपीठमहाराष्ट्र चेंबरच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा दिमाखात, मुख्यमंत्र्यांनी केले गाव तिथे उद्योजक उपक्रमाचे कौतुक श्री आनंदराव आबिटकर कॉलेज ऑफ इंजिनिअरींगमध्ये इंजिनिअरिंग प्रवेशासाठी मोफत सुविधा केंद्र

जाहिरात

 

आषाढी वारीसाठी जिल्हा परिषदेचे वैद्यकीय मदत पथक सज्ज, औषध किटसह पथक आळंदीसाठी रवाना!

schedule08 Jul 26 person by visibility 119 categoryजिल्हा परिषद

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : श्री क्षेत्र पंढरपूर आषाढी एकादशी पालखी सोहळ्यानिमित्त वारकऱ्यांच्या आरोग्य सेवेसाठी कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही विशेष वैद्यकीय मदत पथके रवाना करण्यात आली.या उपक्रमांतर्गत यावर्षीचे पहिले  वैद्यकीय मदत पथक बुधवारी, आठ जुलै रोजी मार्गस्थ झाले. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शिल्पा खोत यांच्या हस्ते हस्ते पूजन करून आळंदीसाठी मार्गस्थ करण्यात आले. याप्रसंगी उपाध्यक्ष तानाजी पाटील, बांधकाम समिती सभापती सारिका नांदेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जॅसमिन, जिल्हा आरोग्य अधिकारी अनिरुद्ध् पिपंळ उपस्थित होते

उद्घाटन होऊन रवाना झालेल्या पहिल्या वैद्यकीय पथकामध्ये अत्यंत अनुभवी आणि तत्पर वैद्यकीय कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.र पथक अत्याधुनिक जीवनरक्षक औषधे आणि वैद्यकीय साधनसामुग्रीने सुसज्ज असलेल्या रुग्णवाहिकेसह मार्गस्थ झाले आहे. या पथकात समुदाय आरोग्य अधिकारी, औषध निर्माण अधिकारी, आरोग्य सेवक, रुग्णवाहिका व वाहन चालक, अत्यावश्यक व आपत्कालीन औषध साठा, 100 औषध किट वाटप आहेत. वारकरी दिंड्यांसाठी *शंभर औषध किट्सचे अध्यक्षा खोत यांच्या हसते प्रमुख दिंडी प्रमुखांना प्रातिनिधिक स्वरूपात वितरित करण्यात आले.

आरोग्यमंत्री व पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या सूचनेनुसार वारी मार्गावर आरोग्याची विशेष खबरदारी घेण्यात आली आहे.जिल्हा परिषदेने वारी मार्गावरील स्वच्छतेची व आरोग्याची चोख व्यवस्था केली आहे. आषाढी वारी दरम्यान ज्या ज्या ठिकाणी वारकऱ्यांचे मुक्काम असणार आहेत, त्या सर्व ठिकाणी खबरदारीचा उपाय म्हणून स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या माध्यमातून दोन दिवस आधीपासूनच व्यापकस्तरावर धूर फवारणी करण्यात येणार आहे. तसेच वैद्यकीय सुविधा उपलब्ध आहेत असे जिल्हा आरोग्य अधिकारी पिंपळे यांनी सांगितले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes