Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
मंगेश चिवटेंना शिक्षक मतदारसंघातून विधान परिषदेत पाठवा : आमदार राजेश क्षीरसागर,  आमदार सुहास बाबर यांची  मागणीगोकुळच्या राजकारणात आमनेसामने उभे ठाकलेले एसटी बसेसच्या उद्घाटनला एकत्रविद्यार्थी चमकले शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीत, शाळेने काढली मिरवणूक झोकात!व्यापारी किशोरकुमार नष्टे यांचे निधनजुनी पेन्शनसाठी शिक्षकदिनी शिक्षकांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चानैसर्गिक न्यायतत्वाद्वारे त्या संस्थांनाही मतदानाचा अधिकार मिळावा -विकास पाटील कुरुकलीकरकोल्हापुरात मंगळवारी अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलनविवेकानंद संस्थेकडून ४४ हजार फॉर्म जमा, चंद्रकांत पाटील म्हणाले, तर कौस्तुभला तिकीट अन् विजयही निश्चितस्थायी समितीत पाठपुरावा, ४३३ ग्रामपंचायतीला मिळाले आर्थिक खर्चाचे अधिकारविवेकानंद शिक्षण संस्था ठरवेल तोच  पुणे शिक्षक मतदारसंघाचा आमदार असेल - मंत्री चंद्रकांत पाटील

जाहिरात

 

कोल्हापूर - सांगलीसह चार जिल्ह्यातील खाजगी रुग्णालयांची विशेष तपासणी; नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई

schedule08 Jul 26 person by visibility 464 categoryआरोग्य

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : नागरिकांना सुरक्षित, दर्जेदार नियमबद्ध आरोग्यसेवा उपलब्ध व्हावी तसेच खाजगी रुग्णालयांमध्ये सरकारने निर्धारित केलेल्या कायदेशीर तांत्रिक निकषांचे काटेकोर पालन होत असल्याची खात्री करण्यासाठी राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या आदेशानुसार बॉम्बे नर्सिंग होम्स रजिस्ट्रेशन अॅक्ट अंतर्गत नोंदणीकृत खासगी रुग्णालयांची विशेष तपासणी करण्यात येणार आहेया निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी आरोग्य विभागाचे कोल्हापूर मंडळही कार्यरत असून, कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व नोंदणीकृत खासगी रुग्णालयांची टप्प्याटप्प्याने तपासणी केली जाणार आहे.

कोल्हापूर मंडळात बॉम्बे नर्सिंग होम्स रजिस्ट्रेशन अॅक्ट अंतर्गत एकूण हजार ३६० खासगी रुग्णालये नोंदणीकृत आहेत. त्यामध्ये कोल्हापूर६७०, सांगली४५८, रत्नागिरी१४६ आणि सिंधुदुर्ग८६ रुग्णालयांचा समावेश आहे. उपसंचालक, आरोग्य सेवा, कोल्हापूर मंडळ यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय समिती स्थापन केली आहे. जिल्हास्तरावर विशेष तपासणी पथके असतील. ही पथके प्रत्येक रुग्णालयाला प्रत्यक्ष भेट देऊन कायद्यानुसार आवश्यक असलेल्या सर्व बाबींची सखोल पडताळणी करणार आहेत.

 तपासणीदरम्यान रुग्णालयामध्ये रुग्णशुल्क इतर सेवा शुल्काचे दरपत्रक दर्शनी भागात लावले आहे का, रुग्ण हक्क संहिता ठळकपणे प्रदर्शित केली आहे का, फायर ऑडिट पूर्ण आहे का, तसेच इतर आवश्यक नियमांचे पालन करण्यात आले आहे का, याची विशेष तपासणी केली जाणार आहे. तपासणीदरम्यान नियमांचे उल्लंघन, आवश्यक सुविधांचा अभाव, खोटी माहिती, बेकायदेशीर कामकाज किंवा रुग्णांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण करणाऱ्या त्रुटी आढळल्यास संबंधित संस्थांविरुद्ध प्रशासकीय कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.

ही कारवाई कोणत्याही संस्थेला त्रास देण्यासाठी नसून राज्यातील नागरिकांना सुरक्षित, गुणवत्तापूर्ण आणि नियमबद्ध आरोग्यसेवा मिळावी हा यामागील मुख्य उद्देश आहे. सर्व खासगी रुग्णालयांनी नियमांचे काटेकोर पालन करून तपासणी प्रक्रियेस पूर्ण सहकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्री आबिटकर यांनी केले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes