Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
संस्थेच्या नावांनी बनावट नियुक्ती आदेश, पाच जणांविरोधात पोलिसात गुन्हा दाखलविवेकानंद कॉलेजच्या प्राचार्यपदी डॉ. मिलिंद हुजरेराज्य तंत्रशिक्षण मंडळाकडून कोरे डिप्लोमाला अतिशय उत्कृष्ट मानांकनगोकुळ जपू या - गोकुळ वाढवू या, डॉ. युवराज येंडुरेंच्या नेतृत्वाखालील आत्मक्लेश आंदोलनात शेतकरीही सहभागी  जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीच्या चेअरमनपदी बाजीराव पाटीलकोल्हापूर - सांगलीसह चार जिल्ह्यातील खाजगी रुग्णालयांची विशेष तपासणी; नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाईआषाढी वारीसाठी जिल्हा परिषदेचे वैद्यकीय मदत पथक सज्ज, औषध किटसह पथक आळंदीसाठी रवाना!शहीद वीरपत्नी लक्ष्मी महाविद्यालयात इंडक्शन प्रोग्राम, विद्यार्थिनींच्या कलागुणांना लाभले व्यासपीठमहाराष्ट्र चेंबरच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा दिमाखात, मुख्यमंत्र्यांनी केले गाव तिथे उद्योजक उपक्रमाचे कौतुक श्री आनंदराव आबिटकर कॉलेज ऑफ इंजिनिअरींगमध्ये इंजिनिअरिंग प्रवेशासाठी मोफत सुविधा केंद्र

जाहिरात

 

शहीद वीरपत्नी लक्ष्मी महाविद्यालयात इंडक्शन प्रोग्राम, विद्यार्थिनींच्या कलागुणांना लाभले व्यासपीठ

schedule08 Jul 26 person by visibility 59 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : "महाविद्यालयाने शिक्षणाच्या पहिल्याच आठवड्यात आम्हाला आत्मविश्वास, प्रेरणा आणि आमच्या कलागुणांना व्यासपीठ दिले. हा अनुभव आमच्या भविष्यात निश्चितच मोलाचा ठरेल," अशा भावना शहीद वीरपत्नी लक्ष्मी महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी व्यक्त केल्या.

निमित्त होतं, कॉलेजतर्फे आयोजित इंडक्शन प्रोगामच. राधानगरी तालुक्यातील तिटवे येथील शहीद वीरपत्नी लक्ष्मी महाविद्यालय येथे नव्याने प्रवेश घेतलेल्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थिनींसाठी आयोजित सात दिवसीय इंडक्शन प्रोग्राम उत्साहपूर्ण वातावरणात झाला. विद्यार्थिनींना महाविद्यालयीन जीवनाशी परिचित करून देणे, त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करणे, सामाजिक जाणीव विकसित करणे आणि सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासाला चालना देणे हा कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता.

इंडक्शन प्रोग्रामच्या निमित्ताने महाविद्यालयाने पर्यावरण संवर्धनाला विशेष प्राधान्य देत चक्रेश्वरवाडी परिसरात वृक्षारोपणाचा उपक्रम राबविला. विद्यार्थिनींनी उत्साहाने वृक्ष लागवड केली. निसर्गमित्र अनिल चौगुले यांनी महिला आणि शाश्वत विकास या विषयावर महिलांची समाजातील भूमिका, पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत विकासातील योगदान याविषयी मार्गदर्शन केले. प्रा. अविनाश पालकर यांनी "स्वतःला ओळखा" या विषयावर आत्मविश्वास, स्व-ओळख आणि ध्येय निश्चितीचे महत्त्व स्पष्ट केले. अरुणा मगदूम यांनी आरोग्य शिक्षणाच्या माध्यमातून मुलींचे सक्षमीकरण या विषयांवर मार्गदर्शन केले. ए. बी. फराकटे यांनी नैतिकता, सामाजिक जबाबदारी आणि मूल्याधिष्ठित जीवनाची प्रेरणा दिली. एस. बी. पवार यांनी व्यक्तिमत्त्व विकास या विषयावर प्रभावी संवादकौशल्य, नेतृत्वगुण आणि व्यावसायिक व्यक्तिमत्त्व घडविण्याचे महत्त्व अधोरेखित केले.  महेश टकले यांनी तणाव व्यवस्थापन, सकारात्मक जीवनशैली, अभ्यासाचे नियोजन आणि मानसिक आरोग्याचे महत्त्व समजावून सांगितले. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे "जोडीदारांची विवेकी निवड" या विषयावर संवादात्मक सत्र घेण्यात आले. मेहंदी आणि वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन केले. कार्यक्रमाचे समन्वयन प्रा. अविनाश पालकर यांनी केले. यावेळी संस्थेच्या अध्यक्षा वीरपत्नी लक्ष्मीबाई पाटील प्रमुख उपस्थित होत्या. जागतिक शिक्षणतज्ज्ञ डॉ. जगन्नाथ पाटील यांचे सहकार्य लाभले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रशांत पालकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा इंडक्शन प्रोग्राम पार पडला.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes