Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
औषध विक्रेत्यांचा बंद, जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाखासगी क्लास संचालकांची सरकारकडे मागणी, नीट पेपरफुटीप्रकरणी दोषीवर कारवाई व्हावीदूरशिक्षण प्रसारासाठी समन्वयकांनी पुढाकार घ्यावा: डॉ. कृष्णा पाटीलचालुक्य स्पोर्टस अॅकेडमीतर्फे क्रीडा महोत्सव, प्रवेश निशुल्कश्री आंनदराव आबिटकर इंजिनीअरींग कॉलेजमध्ये सिव्हील - एआय शाखांचा विस्तारगांधीनगरमधील अनधिकृत बांधकामावरील कारवाईला स्थगिती देण्यास सर्किट बेंचचा नकारअजीम नवाज राही यांना रत्नाकर काव्य पुरस्कारकुलगुरू नियुक्तीला दिरंगाई, सिनेट सदस्यांचे राज्यपालाना पत्र ! लाठया खाऊ, जेलमध्ये जाऊ पण शक्तीपीठ महामार्ग होऊ देणार नाही ! नऊ जूनला कोल्हापुरात महामोर्चा !!डीवाय पाटील ज्युनिअर कॉलेजची महिमा शिर्के बुद्धिबळ स्पर्धेत द्वितीय

जाहिरात

 

चारचाकी वाहन सारले बाजूला…नगरसेवक सवार झाले इलेक्ट्रिक बाईक, सायकलवर !

schedule18 May 26 person by visibility 156 categoryमहानगरपालिका

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : अलिशान गाडया आणि फॅन्सी नंबरही काही नगरसेवकांची ओळख बनली आहे. विशिष्ट नंबरची गाडी दिसली की संबंधित नगरसेवक महापालिका चौकात आहेत याची खात्री पटते. नेहमी अशा गाडयांनी गजबजणारा महापालिकेतील महर्षी विठठल रामजी शिंदे चौकात सोमवारी, १८ मे २०२६ रोजी वेगळेच चित्र होते. चारचाकी वाहन बाजूला सारत काही नगरसेवक चालत महापालिकेत पोहोचले. डोक्यावर हेल्मेट परिधान करत  इलेक्ट्रिक बाईकवर स्वार होत काहींची महापालिकेत इंन्ट्री झालीतर कोण सायकलवरुन महापालिका गाठली. काही नगरसेवकांनी केएमटीतून प्रवास केला.

 निमित्त होतंइंधन बचतीच्या उपक्रमाचे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन बचतीचे आवाहन केले आहे. त्या आवाहनाला प्रतिसाद देत महापौर रुपाराणी निकम यांनी, सोमवारी, पेट्रोल-बचतीसाठी महापालिकेतील सगळया नगरसेवकांना, अधिकारी व कर्मचाऱ्यांना ई बाइक, सार्वजिनक वाहतूक व्यवस्थेतंर्गत केएमटी बसेसचा वापर करण्याचे आवाहन केले होते. महापालिकेची सर्वसाधारण सभा ११.३० वाजता होती. या सभेसाठी येताना बहुसंख्य नगरसेवकांनी इलेक्ट्रिक बाईकचा वापर केला. महापौर निकम, नगरसेविका माधुरी व्हटकर, रेखा उगवे या इलेक्ट्रिक बाईकवरुन महापालिकेत पोहोचल्या. उपमहापौर अक्षय जरग हे दुचाकीवरुन आले.

 काही नगरसेवकांनी केएमटी बसमधून प्रवास केला. महापालिकेत ते चालत आले. विरोधी पक्षनेते राजेश लाटकर, विनायक फाळके, सुभाष बुचडे हे महापालिकेत चालत आले. नगरसेवक संजय मोहिते यांनी सायकलवरुन महापालिका गाठली. स्थायी समिती सभापती विशाल शिराळे, महिला व बालकल्याण समिती सभापती दीपा ठाणेकर,सभागृह नेते मुरलीधर जाधव, काँग्रेसचे गटनेते इंद्रजीत बोंद्रे, राष्ट्रवादीचे गटनेते आदिल फरास, नगरसेवक आशकिन आजरेकर, नगरसेविका सृष्टी जाधव, नगरसेविका डॉ. नेहा तेंडुलकर नगरसेविका प्रतिज्ञा उत्तुरे यांनी इलेक्ट्रिक बाइक चालवत महापालिकेपर्यंत प्रवास केला. महापालिकेचे अधिकारी, कर्मचारीही इंधन बचतीच्या उपक्रमात सहभागी झाले. आयुक्त राजेंद्र भारुड, अतिरिक्त आयुक्त् रविकांत आडसूळ हे इलेक्ट्रक वाहनातून महापालिकेत दाखल झाले. अन्य अधिकाऱ्यांनी या उपक्रमात भाग घेतला. पेट्रोल व डिझेल बचतीसाठी पर्यावरणूरक वाहतुकीचा अवलंब केला.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes