Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
औषध विक्रेत्यांचा बंद, जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाखासगी क्लास संचालकांची सरकारकडे मागणी, नीट पेपरफुटीप्रकरणी दोषीवर कारवाई व्हावीदूरशिक्षण प्रसारासाठी समन्वयकांनी पुढाकार घ्यावा: डॉ. कृष्णा पाटीलचालुक्य स्पोर्टस अॅकेडमीतर्फे क्रीडा महोत्सव, प्रवेश निशुल्कश्री आंनदराव आबिटकर इंजिनीअरींग कॉलेजमध्ये सिव्हील - एआय शाखांचा विस्तारगांधीनगरमधील अनधिकृत बांधकामावरील कारवाईला स्थगिती देण्यास सर्किट बेंचचा नकारअजीम नवाज राही यांना रत्नाकर काव्य पुरस्कारकुलगुरू नियुक्तीला दिरंगाई, सिनेट सदस्यांचे राज्यपालाना पत्र ! लाठया खाऊ, जेलमध्ये जाऊ पण शक्तीपीठ महामार्ग होऊ देणार नाही ! नऊ जूनला कोल्हापुरात महामोर्चा !!डीवाय पाटील ज्युनिअर कॉलेजची महिमा शिर्के बुद्धिबळ स्पर्धेत द्वितीय

जाहिरात

 

अजीम नवाज राही यांना रत्नाकर काव्य पुरस्कार

schedule19 May 26 person by visibility 57 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर: दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेच्यावतीने कवी धम्मपाल रत्नाकर यांच्या स्मृत्यर्थ देण्यात येणा-या २०२५ या वर्षातील राज्यस्तरीय रत्नाकर काव्य पुरस्कारासाठी अजीम नवाज राही यांच्या ‘वळीवाच्या वेळा‘ या  संग्रहाची निवड करण्यात आली आहे. दहा हजार रुपये, गौरवचिन्ह आणि प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरुप आहे.

या पुरस्कार निवडीसाठी परीक्षक म्हणून कवी, समीक्षक डॉ. रफीक सूरज यांनी काम पाहिले. पुरस्कार पुरस्कार प्रदान समारंभ रविवारी २४ मे २०२६ रोजी सकाळी १०.३० वा. शेठ रामभाई सामाणी सभागृह, शिवाजी उद्यमनगर,कोल्हापूर येथे होणार आहे. धम्मपाल रत्नाकर काव्य पुरस्कार यापूर्वी श्रीधर नांदेडकर, श्रीकांत देशमुख, वीरधवल परब, कल्पना दुधाळ, संजीवनी तडेगावकर, अरुण इंगवले, पी. विठ्ठल, सुरेश सावंत, अजय कांडर, सारिका उबाळे, सुचिता खल्लाळ, पद्मरेखा धनकर, दीपक बोरगावे, कविता मुरुमकर, हबीब भंडारे, गोविंद काजरेकर, राजेंद्र दास, केशव देशमुख, कीर्ती पाटसकर, अनिल धाकू कांबळी, ऐश्वर्य पाटेकर,संजय कृष्णाजी पाटील, सुनिता झाडे यांना देण्यात आला आहे. साहित्य सभेचे कार्यवाह डॉ. विनोद कांबळे यांनी ही माहिती दिली आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes