Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
औषध विक्रेत्यांचा बंद, जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाखासगी क्लास संचालकांची सरकारकडे मागणी, नीट पेपरफुटीप्रकरणी दोषीवर कारवाई व्हावीदूरशिक्षण प्रसारासाठी समन्वयकांनी पुढाकार घ्यावा: डॉ. कृष्णा पाटीलचालुक्य स्पोर्टस अॅकेडमीतर्फे क्रीडा महोत्सव, प्रवेश निशुल्कश्री आंनदराव आबिटकर इंजिनीअरींग कॉलेजमध्ये सिव्हील - एआय शाखांचा विस्तारगांधीनगरमधील अनधिकृत बांधकामावरील कारवाईला स्थगिती देण्यास सर्किट बेंचचा नकारअजीम नवाज राही यांना रत्नाकर काव्य पुरस्कारकुलगुरू नियुक्तीला दिरंगाई, सिनेट सदस्यांचे राज्यपालाना पत्र ! लाठया खाऊ, जेलमध्ये जाऊ पण शक्तीपीठ महामार्ग होऊ देणार नाही ! नऊ जूनला कोल्हापुरात महामोर्चा !!डीवाय पाटील ज्युनिअर कॉलेजची महिमा शिर्के बुद्धिबळ स्पर्धेत द्वितीय

जाहिरात

 

श्री आंनदराव आबिटकर इंजिनीअरींग कॉलेजमध्ये सिव्हील - एआय शाखांचा विस्तार

schedule20 May 26 person by visibility 40 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गेली दोन वर्षापासून सुरू झालेल्या श्री आनंदराव आबिटकर कॉलेज ऑफ इंजिनीअरींग, पाल, (भुदरगड) कॉलेजमध्ये डिप्लोमा इंजिनीअरींग विभागामध्ये आर्टीफिशल इंटेलिजन्स अँन्ड मशिन लर्निंग ची 60 वरुन 120 अशी प्रवेश क्षमता वाढीबरोबर नव्याने सिव्हील डिप्लोमा 60 प्रवेश क्षमतेस अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली  यांची मान्यता मिळाली असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य अर्जुन आबिटकर यांनी दिली आहे.

डिजिटल क्रांती घडवत असलेल्या एआय तंत्रज्ञानाचा वाढता वापर आयटी क्षेत्रात होत असल्याने एआयएमएल इंजिनिअर्सना प्राधान्य दिले जात आहे. तसेच, देशात वेगाने होत असलेल्या पायाभूत विकासामुळे सिव्हिल इंजिनिअर्सची मागणी वाढली आहे असून ही मागणी लक्षता घेता यावर्षीपासून हे दोन्ही कोर्स सुरू होत असल्याचे सांगितले.

आजच्या काळात दहावी नंतर डिप्लोमा इंजिनीअरींग हा करिअरचा एक उत्तम पर्याय आहे. राज्यशासनाने मुलींना मोफत शिक्षण व विद्यार्थ्यांना फी सवलत उपलब्ध करून दिली आहे. तसेच विद्यार्थ्यांना प्रवेश मार्गदर्शन केंद्र सुरू केले असून विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन प्राचार्य उमेश पाटील यांनी केले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes