Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
घघक्षढढ णणभारतीय जनरल कामगार सेनेतर्फे निदर्शने, कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवरदमसाचे पुरस्कार जाहीर, 24 मे रोजी पुरस्कार वितरण समारंभ शाहू महाराज हायस्कूलचा दहावीचा निकाल ९७.९८ टक्केफुटबॉलपटूनी चषक जिंकला… अॅक्टिव्हा बक्षीस देऊन होणार गौरवम्युझिकल फाऊटेंनच्या कामात कोणतीही तडजोड नको : आमदार राजेश क्षीरसागरजिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाची कामगिरी भारी, शैक्षणिक कार्यक्षमता प्रतवारीत देशात प्रथम क्रमांक वूलू स्वच्छतागृह ठरणार महिला भाविकांसाठी आधारवड ! मातृदिनी भाजपची कोल्हापूरकरांना अनोखी भेट! !शिक्षक बँकेच्या अध्यक्षपदी एस. व्ही. पाटील, उपाध्यक्षपदी गजानन कांबळे डीवाय पाटील अभियांत्रिकीच्या स्वप्नील अलंगे यांची बीआयएसएजी-एनमध्ये निवड

जाहिरात

 

फुटबॉलपटूनी चषक जिंकला… अॅक्टिव्हा बक्षीस देऊन होणार गौरव

schedule10 May 26 person by visibility 58 categoryक्रीडा

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापुरात फुटबॉलची मोठी क्रेझ. प्रत्यक्ष सामन्यावेळी गोल करणाऱ्या खेळाडूंना फुटबॉल शौकिन वैयक्तिक बक्षीस जाहीर करतात. आवडत्या संघाने सामना जिंकला, स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले तर बक्षीसांची खैरात ठरलेली. वेताळमाळ तालीम मंडळाने सतेज चषक फुटबॉल स्पर्धा जिंकली. या खेळाडूंचा गौरव करण्यासाठी संघातील पंधरा खेळाडूंना चक्क अॅक्टिव्हा भेट स्वरुपात देण्यात येणार आहेत. सत्यम सागर कोराने यांनी ११ खेळाडूंना प्रत्येकी एक अशा अकरा अॅक्टिव्हा तर राजेंद्र बाबूराव साळोखे यांनी चार खेळाडूंना प्रत्येकी एक अशा चार अॅक्टिव्हा देणार आहेत. एकूण १५ दुचाकी पंधरा खेळाडूंना प्रदान करत त्यांचा अनोखा सत्कार होणार आहे. सोमवारी, ११ मे २०२६ रोजी सायंकाळी सहा वाजता छत्रपती शाहू स्टेडियम येथे हा बक्षीस समारंभ होणार आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes