वूलू स्वच्छतागृह ठरणार महिला भाविकांसाठी आधारवड ! मातृदिनी भाजपची कोल्हापूरकरांना अनोखी भेट! !
schedule10 May 26 person by visibility 90 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : महिला भाविक, पर्यटकांसह कोल्हापुरातील महिलांसाठी आता वातानुकूलित सर्व सुविधांनीयुक्त स्वच्छतागृह उपलब्ध झाले आहे. ह्या स्वच्छता गृहाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड तर आहेच पण हे स्मार्ट सॅनिटेशन सोल्यूशन आहे. स्वच्छता गृहाला जोडूनच महिलांच्या गरजेच्या वस्तु विक्रीसाठी दुकान असल्याने बचत गटातील महिलांना रोजगार सुद्धा उपलब्ध झाला आहे.
महिलांसाठी खासबाग मैदान आणि ताराबाई पार्क इथं बांधलेल्या महिला स्वच्छतागृहांचे लोकार्पण महापौर रुपाराणी निकम, कोल्हापूर जिल्हापरिषद अध्यक्षा शिल्पा खोत व भागीरथी महिला संस्था अध्यक्षा अरुंधती महाडिक ह्यांच्या हस्ते पार पडले. मातृदिनाचे औचित्य साधून रविवारी, दहा मे २०२६ रोजी हा कार्यक्रम झाला. याप्रसंगी खासदार धनंजय महाडिक, आमदार अशोकराव माने, उपमहापौर अक्षय जरग, स्थायी समिती सभापती विशाल शिराळे, सभागृह नेते मुरलीधर जाधव, शिवसेनेचे गटनेते शारंगधर देशमुख, राष्ट्रवादीचे गटनेते आदिल फरास यांची प्रमुख उपस्थिती होती. पडला.
यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी आणि महापालिकाच्या माध्यमातून भाजपा युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांनी पाठपुरावा केल्यानंतर तात्काळ राज्य सरकारने निधी उपलब्ध झाला. या माध्यमातून कोल्हापूर शहरातील खासबाग मैदान चौक, आणि ताराबाई पार्क इथल्या एसटी कार्यशाळेबाहेरील जागेत महिलांसाठी स्वच्छतागृह उभारणीच्या कामाला प्रारंभ झाला. दोन महिन्यात ही स्वच्छतागृहं बांधून तयार झाली असून, महिलांसाठी सर्व सुविधांयुक्त अशी ही स्वच्छतागृहे आहेत.
भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष कृष्णराज महाडिक यांनी वूलू ह्या स्वच्छता गृहांच्या आधुनिकता, स्वच्छता व सुरक्षा ह्या विषयी माहिती दिली. तसेच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानत आहे. वूलू स्वच्छता गृहाची संकल्पना ही स्वच्छ भारत अभियानाच्या प्रेरणतूनच जन्माला आली असे प्रतिपादन केले. भाषणात त्यांनी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण, संपूर्ण कोल्हापूर महानगर पालिका यांचे आभार मानले व वूलू चे कोल्हापूर मॉडेल हे संपूर्ण भारत देशामध्ये प्रेरणा ठरेल असा आत्मविश्वास व्यक्त केला. खासदार महाडिक यांनी कोल्हापूर महानगरपालिकेत महायुतीची सत्ता आल्यापासून जनतेला दिलेले अभिवचन पूर्ण करण्यात येत आहेत. याप्रसंगी भाजपाचे प्रदेश सचिव महेश जाधव, चॅनल बीचे व्यवस्थापकीय संचालक पृथ्वीराज महाडिक आश्किन आजरेकर, प्रकाश गवंडी, पूर्वा राणे, माधुरी नकाते, पल्लवी देसाई, रेखा उगवे, माधुरी व्हटकर, दीपा काटकर, सुरेखा ओटवकर, नेहा तेंडुलकर, अर्चना कोराणे, विजय खाडे पाटील, सृष्टी जाधव, दीपा ठाणेकर, महेश वासुदेव, उत्तम पाटील, युवा मोर्चाचे विश्वजीत पोवार उपस्थित होते.