Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
रविकिरण इंगवले यांचा शिवसेना जिल्हाप्रमुखपदाचा राजीनामाभाजपही सरसावला, सोमवारी शक्तीप्रदर्शनाद्वारे गोकुळसाठी ठराव दाखल करणारगोकुळच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच मोठा भाऊ ! आमच्याकडे 1971 ठराव, महायुतीचा झेंडा फडकवणार ! मंत्री हसन मुश्रीफ!जिल्हा परिषद सेवानिवृत्त कर्मचारी सेवा समितीतर्फे शाहू जयंतीदिनी रक्तदान शिबीरलाचप्रकरण पडले महागात, शिक्षण विस्तार अधिकारी डी. सी. कुंभार निलंबितएकीकडे आमदार – खासदार ! दुसरीकडे पैशांचा पाऊस, दूध उत्पादक मात्र आमच्यासोबत ! !  सत्यजीत पाटीलपशुसंवर्धन विभागामार्फत चारा उत्पादन कार्यक्रमकोल्हापूरच्या हद्दवाढीबाबत सरकारने तातडीने निर्णय घ्यावा; आमदार राजेश क्षीरसागरांची विधीमंडळात मागणीजिल्ह्यातील ४६ हजारांहून अधिक निरक्षर,  प्रशासनाने ठरविले शंभर टक्के साक्षरतेचे उद्दिष्टटीईटी परीक्षेसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज ; अधिका-यांनी घेतले केंद्रसंचालकांचे प्रशिक्षण

जाहिरात

 

गोकुळच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच मोठा भाऊ ! आमच्याकडे 1971 ठराव, महायुतीचा झेंडा फडकवणार ! मंत्री हसन मुश्रीफ!

schedule25 Jun 26 person by visibility 3020 categoryउद्योग

 महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाने ठराव दाखल करताना प्रचंड शक्ती प्रदर्शन केले. मंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीमध्ये महासैनिक दरबार हॉल येथे राष्ट्रवादी काँग्रेसने ठरावधारकांचा मेळावा घेतला. या मेळाव्याला प्रचंड गर्दी होती. या मेळाव्यात बोलताना मंत्री मुश्रीफ यांनी ,' राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे 1971 ठराव आहेत. यामध्ये आणखी भर पडेल. गोकुळच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हाच मोठा भाऊ असणार आणि गोकुळमध्ये महायुतीचा झेंडा फडकेल असा विश्वास ही त्यांनी व्यक्त केला
 गुरुवारी 25 जून 2026 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे गोकुळ दूध  संघाच्या निवडणुकीसाठी अर्ज ठराव दाखल करण्यासाठी मोठी गर्दी करण्यात आली. पारंपारिक वाद्यांच्या गजरात मिरवणुकीने ठराव दाखल क करण्यासाठी ठराव धारक मार्गस्थ झाले . दरम्यान महासैनिक दरबार हॉल येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये  मेळावा झाला या मेळाव्यात मंत्री मुश्रीफ यांनी तालुकानिहाय ठरावांची यादीच वाचली. यामध्ये करवीर तालुक्यातून जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पी एन पाटील गटातर्फे 223 ठराव,  राधानगरी तालुक्यामध्ये गोकुळचे माजी चेअरमन अरुणकुमार डोंगळे , माजी संचालक प्रा.किसन चौगुले व राहुल पी.एन पाटील मिळून 384 ठराव,  कागल तालुक्यातून राष्ट्रवादी व माजी चेअरमन नवीद मुश्रीफतर्फे 284, भुदरगड तालुक्यातून माजी आमदार के पी पाटील व गोकुळचे माजी संचालक रणजितसिंह पाटील यांच्याकडून 213 ठराव,  चंदगडमध्ये माजी आमदार राजेश पाटील यांच्याकडून 165 ठराव, गडहिंग्लज तालुक्यातून जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सतीश पाटील व नंदिनी बाभुळकर यांच्याकडून 222 ठराव, शिरोळमधून अमरसिंह माने व समर्थकांकडून 165 ठराव , शाहूवाडी तालुकातून जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक रणवीरसिंह गायकवाड यांच्याकडून 42 ठराव , आजरा येथून जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक सुधीर देसाई व समर्थकांकडून 152 , पन्हाळा तालुक्यातून राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील आसुरलेकर व समर्थकांकडून 50 ठराव,  हातकणंगले तालुक्यातून 67 तर गगनबावडा येथे चार ठराव मिळाले आहेत असे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले
[महासैनिक दरबार हॉल येथून मिरवणुकीने जाऊन ठराव दाखल करण्यासाठी नेतेमंडळी व ठरावधारक दुपारी बाहेर पडले. प्रत्येक तालुकानिहाय ठराव दाखल होणार आहेत. दरम्यान महासैनिक दरबार हॉल येथे झालेल्या मेळाव्याला माजी आमदार के पी पाटील , माजी आमदार राजेश पाटील, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील, गोकुळचे माजी चेअरमन अरुणकुमार डोंगळे, भोगावती सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन शिवाजीराव पाटील, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक सुधीर देसाई, भोगावती कारखान्याचे माजी चेअरमन धैर्यशील पाटील, जिल्हा परिषद सदस्य क्रांतिसिंह पवार पाटील,राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील आसुरलेकर, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक रणवीरसिंह गायकवाड, गोकुळचे संचालक युवराज पाटील, प्रा किसन चौगुले , बाळासाहेब खाडे,  शंकरराव पाटील, भारत पाटील भुयेकर, राजेखान जमादार, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सतीश पाटील, उमेश भोईटे, अमरसिंह माने, केरबा पाटील अमित गाताडे, विकास पाटील,  शेखर देसाई राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आदिल फरास, माजी नगरसेवक महेश सावंत, संदीप कवाळे   प्रकाश गवंडी , सतीश लोळगे आदी उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes