Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
मंत्री खासदारांसह केंद्रीय रेल्वेमंत्र्यांना भेटणार ! कोल्हापूर वैभववाडी प्रकल्प कामाला गती मिळावी - सुरेंद्र जैनपाडळी खुर्दमध्ये धनुष्यबाणाचेच वारं… सचिन पाटलांचा विजय पक्का ! शिरोली दुमालातील प्रचारफेरीत दुमदुमला नारा !!प्रभावी विकासकामांची धमक शिवसेनेच्या उमेदवारांत, पाडळी खुर्द मतदारसंघातील मतदारांचा वाढता पाठिंबा सचिन पाटील, अमित हजारे यांच्या प्रचारार्थ वाशीत प्रचारफेरीचा धडाका कौस्तुभ  गावडे - मयुरी  पाटील यांचा  विवाह  थाटामाटात   अरुंधती महाडिकांची अध्यक्षपदाची कारकिर्द ठरली संस्मरणीय ! रोटरी मिडटाऊनला पंधरा पुरस्कार !!शुक्रवारी शाळा सुट्टीसंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांचे आदेशशिवसेनेच्या तरुण नेतृत्वाकडे विकासात्मक दृष्टी ! सचिन पाटलांची नाळ समाजकार्याशी जुळलेली! !जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या वंदना विजय पाटील भाजपातमहे-जरगवाडीत घुमला शिवसेनेचा आवाज, सचिन पाटलांच्या प्रचारफेरीला मतदारांचा जोरदार प्रतिसाद

जाहिरात

 

प्रभावी विकासकामांची धमक शिवसेनेच्या उमेदवारांत, पाडळी खुर्द मतदारसंघातील मतदारांचा वाढता पाठिंबा

schedule05 Feb 26 person by visibility 71 categoryजिल्हा परिषद

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : शिवसेनेचे पाडळी खर्द जिल्हा परिषद मतदारसंघातील उमेदवार सचिन विश्वास पाटील व पंचायत समिती उमेदवार अमित हजारे यांच्याकडे सामाजिक कार्याचा वारसा लाभला आहे. पाटील व हजारे कुटुंबीय सातत्याने लोकांच्या मदतीला धावून गेले आहेत. अडचणीच्या काळात पाठीशी राहिलेत. या निवडणुकीत या दोघांना विजयी करू असा निर्धार मतदारसंघातील मतदारांनी व्यक्त केला. तसेच या दोन्ही उमेदवारांच्याकडून विकासकामांची पूर्तता होईल असेही मतदारांचे म्हणणे आहे.

माजी उपसरपंच इंद्रजीत पाटील – वाशी येथील बिरदेव देवस्थान हे ब वर्गमध्ये समाविष्ठ करण्याचे प्रस्तावित आहे. या दोन्ही उमेदवारांनी निवडून आल्यानंतर त्याची पूर्तता करावी. जिल्हा परिषदेचे उमेदवार सचिन पाटील व पंचायत समितीचे उमेदवार अमित हजारे या दोघांना वाशी गावातून साठ टक्क्याहून अधिक मतदान होईल.शिवसेनेचे हे दोन्ही उमेदवार विजयी होतील.

सरदार सावंत – उमेदवार सचिन पाटील आणि उमेदवार अमित हजारे यांचे कुटुंबीय हे लोकांच्या सुखदुखात समरस होणारे आहेत. विविध माध्यमातून त्यांनी लोकांना मदतीचा हात दिला आहे. यामुळे या निवडणुकीत आम्ही त्यांना निवडून आणण्याचा निर्धार केला आहे. अमित हजारे यांनी स्वखर्चाने गावकऱ्यांसाठी पाण्याचा टँकर उपलब्ध करुन दिला आहे.

शरद संभाजी सावंत – शिवसेनेचे दोन्ही उमेदवार हे तरुण आहेत. त्यांना समाजकार्याची आवड आहे. लोकांच्यासाठी वेळ देतात. कोणत्याही प्रसंगात भागातील लोकांच्यासोबत राहतात. अमित हजारे हे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबुराव हजारे यांचे पुतणे आहेत. तर जिल्हा परिषदेचे उमेदवार सचिन पाटील हे गोकुळचे माजी चेअरमन विश्वास पाटील यांचा वारसा पुढे चालवित आहेत.

भिकाजी काशीनाथ पाटील – जिल्हा परिषदेचे उमेदवार सचिन पाटील व पंचायत समितीचे उमेदवार अमित हजारे यांच्याकडून मतदारसंघातील विकासकामांची पूर्तता होऊ शकते याची खात्री आहे. पदावर नसतानाही त्यांनी भागातील विविध घटकांना प्रत्येकवेळी मदत केली आहे. भागातील प्रत्येक कामात त्यांचा सहभाग असतो. यामुळे आमचा निर्णय पक्का आहे, या दोघांना निवडून आणू.

शिवसेना शाखाप्रमुख सरदार खालकर – पाडळी खुर्द मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार हे निवडून येतील. मतदारसंघात खूप अनुकूल वातावरण आहे. वाशी गावामध्ये शिवसेनेच्या दोन्ही उमेदवारांना जवळपास सत्तर टक्के मतदान होईल. त्यांनी मतदारसंघातील विकासकामांना गती द्यावी. विविध सोयी सुविधा उपलब्ध कराव्यात. सरकारी योजनांचा लाभ ग्रामीण भागातील लोकांपर्यंत पोहोचवाव्यात.

श्रीधर कांबळे – जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत पाडळी खुर्द मतदारसंघात शिवसेना विजयी होईल, इतका चांगला प्रतिसाद मतदारांचा आहे. उमेदवार सचिन पाटील व अमित हजारे या दोघांचा जनसंपर्क मोठा आहे. त्यांच्याकडून विकासकामांची प्रभावी अंमलबजावणी होईल असा विश्वास आहे. वाशीला प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर आहे. हे केंद्र पूर्णत्वास न्यावे. तसेच यात्रा कालावधीत आणखी सेवा सुविधा उपलब्ध कराव्यात

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes