Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
दक्षिणमधील तेरा गावाची जलजीवन योजना रखडली ! ! पाण्यासाठी घागर मोर्चा, कंत्राटदाराला पाण्याची आंघोळ ! ! आबिटकर ज्युनिअर कॉलेजचा बारावीचा १०० टक्के निकालसीआयआयच्या इंडियन वुमेन नेटवर्क महाराष्ट्र अध्यक्षपदी पल्लवी कोरगावकरमुख्याध्यापक संजय सौंदलगे  राज्यस्तरीय आयडियल टिचर पुरस्काराने सन्मानित९० दिवसात निवडणुका घ्या, गोकुळ निवडणुकीबाबत सुप्रीम कोर्टाचा आदेशबाजार समितीच्या तीन संचालकांना अपात्रतेसंबंधी नोटिस, १९ मे रोजी म्हणणे मांडण्याचे आदेशविनायक भोसले यांना लायन्स गौरव पुरस्कार प्रदानमहापौर चषक फुटबॉल स्पर्धेस उत्साहात प्रारंभ ! वेताळमाळ, पाटाकडील संघाची तालीम विजयी सलामी !!महिला - बाल कल्याण समितीच्या सभेत अंगणवाडी सक्षमीकरणावर चर्चाजीवन प्राधिकरण कार्यालयावर गुरुवारी  घागर मोर्चा

जाहिरात

 

बुधवारपासून चंद्रकांत चषक फुटबॉल स्पर्धा, यंदाची सर्वाधिक बक्षिसाची मोठी स्पर्धा

schedule16 Mar 26 person by visibility 289 categoryक्रीडा

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : बालगोपाल तालीम मंडळ आयोजित व जाधव इंडस्ट्रीज पुरस्कृत "चंद्रकांत चषक -२०२६" फुटबॉल स्पर्धेला १८ मार्च 2026 पासून शाहू स्टेडियम येथे सुरुवात होत आहे. या स्पर्धेतील विजेत्या संघाला २ लाख ३१ हजार रुपये आणि चंद्रकांत चषक, उपविजेत्या संघाला १ लाख ३१ हजार रुपये आणि चंद्रकांत चषक, त्याच बरोबर उपांत्य फेरीत येणाऱ्या संघांना प्रत्येकी ३१ हजार रुपयांचे रोख बक्षीस तसेच स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना वैयक्तिक बक्षिसे देण्यात येणार असल्याची माहिती कोल्हापूर महापालिका परिवहन समितीचे सभापती सत्यजित चंद्रकांत जाधव व राजेंद्र कुरणे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

बालगोपाल तालीम मंडळाच्यावतीन १८ मार्च ते २९ मार्च या कालावधीत स्पर्धा होणार आहे. स्पर्धेचे उद्घाटन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष, आमदार राजेश क्षीरसागर, माजी आमदार व विफाचे उपाध्यक्ष मालोजीराजे छत्रपती, माजी खासदार संजय मंडलिक, माजी आमदार व शिवसेनेच्या उपनेत्या जयश्री चंद्रकांत जाधव, महापौर रूपाराणी निकम, उपमहापौर अक्षय जरग, स्थायी समिती सभापती विशाल शिराळे, महिला बालकल्याण समिती सभापती कौसर बागवान, शिवसेनेचे गटनेते शारंगधर देशमुख, शिवसेनेचे समन्वयक सत्यजित कदम, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, स्थायी समितीचे माजी सभापती संभाजी जाधव, जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण लोंढे यांच्या हस्ते बुधवारी दुपारी साडेतीन वाजता होणार आहे.  
स्पर्धेच्या निमित्ताने मैदानावर दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांचे पोस्टर उभारण्यात येणार आहे. तसेच शहराच्या विविध भागात मोक्याच्या ठिकाणी वरिष्ठ सोळा संघातील खेळाडूंची प्रतिमा असणारे बॅनर लावण्यात येणार आहेत. स्पर्धेच्या उद्घाटनाला राज्यस्तरावरील नामांकित व्यक्ती आमंत्रित करण्यात येणार आहे.स्पर्धेतील उत्कृष्ट गोलकीपर, उत्कृष्ट डिफेन्स, उत्कृष्ट हाफ व उत्कृष्ट फॉरवर्ड या चार खेळाडूंना आकर्षक भेटवस्तू आणि गौरव चिन्ह, तर स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूला ३१ हजार रुपये, गौरव चिन्ह आणि भेटवस्तू देऊन गौरवले जाणार आहे. प्रत्येक सामन्यातील मॅन ऑफ द मॅचचा बहुमान मिळवणाऱ्या खेळाडूला ३१०० रूपये बक्षिस देण्यात येणार आहे.
यावेळी उपाध्यक्ष निवास शिंदे, सेक्रेटरी राहुल चव्हाण, जॉईन सेक्रेटरी आप्पासाहेब साळोखे, युवराज कुरणे, रोहन शिंदे, सुदेश मगदूम, सुनील पोवार, कपिल मोहिते, अनिकेत सावंत आदी उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes