Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
दक्षिणमधील तेरा गावाची जलजीवन योजना रखडली ! ! पाण्यासाठी घागर मोर्चा, कंत्राटदाराला पाण्याची आंघोळ ! ! आबिटकर ज्युनिअर कॉलेजचा बारावीचा १०० टक्के निकालसीआयआयच्या इंडियन वुमेन नेटवर्क महाराष्ट्र अध्यक्षपदी पल्लवी कोरगावकरमुख्याध्यापक संजय सौंदलगे  राज्यस्तरीय आयडियल टिचर पुरस्काराने सन्मानित९० दिवसात निवडणुका घ्या, गोकुळ निवडणुकीबाबत सुप्रीम कोर्टाचा आदेशबाजार समितीच्या तीन संचालकांना अपात्रतेसंबंधी नोटिस, १९ मे रोजी म्हणणे मांडण्याचे आदेशविनायक भोसले यांना लायन्स गौरव पुरस्कार प्रदानमहापौर चषक फुटबॉल स्पर्धेस उत्साहात प्रारंभ ! वेताळमाळ, पाटाकडील संघाची तालीम विजयी सलामी !!महिला - बाल कल्याण समितीच्या सभेत अंगणवाडी सक्षमीकरणावर चर्चाजीवन प्राधिकरण कार्यालयावर गुरुवारी  घागर मोर्चा

जाहिरात

 

मुख्याध्यापक संजय सौंदलगे  राज्यस्तरीय आयडियल टिचर पुरस्काराने सन्मानित

schedule06 May 26 person by visibility 125 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : आंतरभारती शिक्षण मंडळ संचलित कोरगांवकर हायस्कूल, कोल्हापूरचे मुख्याध्यापक संजय सौंदलगे यांना ऑनलाईन वृतपत्र गंगाधर यांचेवतीने शैक्षणिक वर्ष २०२५ - २६ च्या राज्यस्तरीय आयडियल टिचर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले . जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शिल्पा खोत यांचे हस्ते शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह, प्रशस्तिपत्र देवून त्यांचा विशेष समारंभात सपत्नीक सत्कार करण्यात आला . मुख्याध्यापक  सौंदलगे यांची शालेय शिक्षण या विभागातून निवड करण्यात आली . त्यांच्या प्रशासकीय  उपक्रमशीलता, साहित्यिक बाबी आणि विविध विषयाचा व्यासंग, प्रशिक्षण शिबीरातील मार्गदर्शन, विविध समित्यांवरील नियुक्ती या बाबींचा विचार करून त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली . याप्रसंगी संपादक कमलाकर वर्टेकर,दादासाहेब लाड, डॉ . स्मिता गिरी, माधवी सौंदलगे, सविता पाटील उपस्थित होते .

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes