Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
दक्षिणमधील तेरा गावाची जलजीवन योजना रखडली ! ! पाण्यासाठी घागर मोर्चा, कंत्राटदाराला पाण्याची आंघोळ ! ! आबिटकर ज्युनिअर कॉलेजचा बारावीचा १०० टक्के निकालसीआयआयच्या इंडियन वुमेन नेटवर्क महाराष्ट्र अध्यक्षपदी पल्लवी कोरगावकरमुख्याध्यापक संजय सौंदलगे  राज्यस्तरीय आयडियल टिचर पुरस्काराने सन्मानित९० दिवसात निवडणुका घ्या, गोकुळ निवडणुकीबाबत सुप्रीम कोर्टाचा आदेशबाजार समितीच्या तीन संचालकांना अपात्रतेसंबंधी नोटिस, १९ मे रोजी म्हणणे मांडण्याचे आदेशविनायक भोसले यांना लायन्स गौरव पुरस्कार प्रदानमहापौर चषक फुटबॉल स्पर्धेस उत्साहात प्रारंभ ! वेताळमाळ, पाटाकडील संघाची तालीम विजयी सलामी !!महिला - बाल कल्याण समितीच्या सभेत अंगणवाडी सक्षमीकरणावर चर्चाजीवन प्राधिकरण कार्यालयावर गुरुवारी  घागर मोर्चा

जाहिरात

 

आबिटकर ज्युनिअर कॉलेजचा बारावीचा १०० टक्के निकाल

schedule07 May 26 person by visibility 82 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेत गारगोटी शहरातील श्री.आनंदराव आबिटकर ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स, गारगोटी कॉलेजच्या सायन्य शाखेतील सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून विद्यालयाचा निकाल १०० टक्के लागला आहे. सर्व विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवून महाविद्यालयाच्या यशाची परंपरा कायम राखली आहे.

महाविद्यालयातील विद्यार्थिनी आयेशा शिकलगार हिने 81.33 टक्के गुण मिळवून गारगोटी केंद्रात विज्ञान शाखेत प्रथम क्रमांक पटकावला. तर नम्रता जावडेकर हिने 76.67 टक्के गुणांसह केंद्रात तृतीय, तर वैष्णवी चौगले 75.83 टक्के तसेच एन्जल रॉड्रिंक्स हिने 74.50 टक्के, सई देसाई 73.67 टक्के गुण मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले.

 यशस्वी विद्यार्थी, पालक व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य अर्जुन आबिटकर यांनी अभिनंदन केले. महाविद्यालयाने नेहमीच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर दिला असून विद्यार्थ्यांची मेहनत, शिक्षकांचे प्रभावी मार्गदर्शन आणि पालकांचा पाठींबा यामुळे विद्यार्थ्यांनी हे यश संपादन केले असल्याचे प्राचार्य तुकाराम माने यांनी सांगितले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes