Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
णण तयढघ ततचप्पल निर्मितीची प्रक्रिया उलगडणाऱ्या ‘द कोल्हापुरी’ पुस्तकाला अकरा पुरस्कार मेघराज भोसले यांच्या समर्थ पॅनेल विरोधात चित्रकर्मी पॅनेल, अपक्षांची संख्याही मोठी मंत्री चंद्रकांत पाटलांची संकल्पना, कोल्हापुरात हितैषी कौन्सिलिंग सेंटरची स्थापनानिर्माता गटात आठ, दिग्दर्शक गटातून नऊ उमेदवार ! अभिनेता गटात पाच जणांमध्ये लढत ! !केआयटीच्यावतीने नूतन कुलगुरू आर के कामत यांचे स्वागत डीवायपी पॉलिटेक्निकचा  योगेश घुले ठरला गुगल स्टुडन्ट अँबेसिडर केएमटीतील रोजंदारी - अनुकंपा कर्मचाऱ्यांना कायम सेवेत सामावून घ्या : सभापती सत्यजित जाधव चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीतून 13 जणांची माघार ! तीन जागा बिनविरोध होणार!!

जाहिरात

 

मंत्री चंद्रकांत पाटलांची संकल्पना, कोल्हापुरात हितैषी कौन्सिलिंग सेंटरची स्थापना

schedule29 May 26 person by visibility 50 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘राजकारणाला समाजकारणाची जोड देत विविध सामाजिक उपक्रमांची अंमलबजावणी करणाऱ्या उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या संकल्पनेतून कोल्हापुरात आता ‘हितैषी कौन्सिलिंग सेंटर’ची सुरुवात होत आहे. शाहूपुरीतील शहाजी लॉ कॉलेजसमोरील विद्या प्रबोधिनीमध्ये हे सेंटर कार्यरत राहील. दरम्यान ३० मे २०२६ रोजी सायंकाळी चार वाजता रेसिडेन्सी क्लब येथे या सेंटरचा औपचारिक उद्घाटन सोहळा आयोजित केला आहे.’ अशी माहिती राहुल चिकोडे, वृंदा सलगर आणि शिवानी निंबाळकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

 हितैषी कौन्सिलिंग सेंटरमध्ये दत्तक प्रक्रियेबाबत अधिकृत व विश्वासार्ह माहिती, तसेच स्वतच्या मुलांसोबत आणखी एका  अनाथ मुलाची जबाबदारी घेणे ज्याला फॉस्टर पॅरेटिंग असे म्हटले जाते त्यासंबंधी नागरिकांत प्रबोधन करण्यात येणार आहे. शिवाय वंध्यत्व निवारण, कुटुंब कलह कमी करण्यासाठी समुपदेशन करण्यात येणार आहेत. दत्तक प्रक्रियेबाबत वर्षा विनोद तावडे, फास्टर पॅरेटिंगसंबंधी श्रेया श्रीकांत भारतीय, वंध्यत्व निवारणाबद्दल डॉ. सतीश पत्की, कौटुंबिक कलह समुपदेशनाबाबत अॅड. किरण खटावकर हे मार्गदर्शन करणार आहेत.सेंटरमध्ये कुशल समुपदेशक, डॉक्टर कार्यरत असणार आहेत. पत्रकार परिषदेला नितीन कामत, राजकुमार पाटील, अमित लवटे आदी उपस्थित होते.

 

 

 

 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes